स्तोत्रसंहिता 75 : 1 (IRVMR)
देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
स्तोत्रसंहिता 75 : 2 (IRVMR)
नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
स्तोत्रसंहिता 75 : 3 (IRVMR)
जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
स्तोत्रसंहिता 75 : 4 (IRVMR)
मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
स्तोत्रसंहिता 75 : 5 (IRVMR)
विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.
स्तोत्रसंहिता 75 : 6 (IRVMR)
विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही.
स्तोत्रसंहिता 75 : 7 (IRVMR)
पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
स्तोत्रसंहिता 75 : 8 (IRVMR)
कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
स्तोत्रसंहिता 75 : 9 (IRVMR)
पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.
स्तोत्रसंहिता 75 : 10 (IRVMR)
तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे * सामर्थ्य तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे † सामर्थ्य उंच करीन.
❮
❯