स्तोत्रसंहिता 76 : 1 (IRVMR)
विजयी व न्यायी देव मुख्य संगीतकारासाठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत. यहूदात देव कळाला आहे, इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.
स्तोत्रसंहिता 76 : 2 (IRVMR)
शालेममध्ये * यरूशलेम त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
स्तोत्रसंहिता 76 : 3 (IRVMR)
तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.
स्तोत्रसंहिता 76 : 4 (IRVMR)
तू जेथे शत्रूंना ठार केलेस, त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
स्तोत्रसंहिता 76 : 5 (IRVMR)
जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 76 : 6 (IRVMR)
हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने, रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
स्तोत्रसंहिता 76 : 7 (IRVMR)
तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
स्तोत्रसंहिता 76 : 8 (IRVMR)
तुझा न्याय आकाशातून आला, आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली.
स्तोत्रसंहिता 76 : 9 (IRVMR)
देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला, न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
स्तोत्रसंहिता 76 : 10 (IRVMR)
खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
स्तोत्रसंहिता 76 : 11 (IRVMR)
परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा, ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.
स्तोत्रसंहिता 76 : 12 (IRVMR)
तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो. पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12