स्तोत्रसंहिता 77 : 1 (IRVMR)
देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान आसाफाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
स्तोत्रसंहिता 77 : 2 (IRVMR)
माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
स्तोत्रसंहिता 77 : 3 (IRVMR)
मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
स्तोत्रसंहिता 77 : 4 (IRVMR)
तू माझे डोळे उघडे ठेवतोस; मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
स्तोत्रसंहिता 77 : 5 (IRVMR)
मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे याबद्दल मी विचार करतो.
स्तोत्रसंहिता 77 : 6 (IRVMR)
रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. मी काळजीपूर्वक विचार करतो आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
स्तोत्रसंहिता 77 : 7 (IRVMR)
प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय? तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
स्तोत्रसंहिता 77 : 8 (IRVMR)
त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
स्तोत्रसंहिता 77 : 9 (IRVMR)
देव दया करण्याचे विसरला का? त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
स्तोत्रसंहिता 77 : 10 (IRVMR)
मी म्हणालो, हे माझे दुःख आहे, आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
स्तोत्रसंहिता 77 : 11 (IRVMR)
पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
स्तोत्रसंहिता 77 : 12 (IRVMR)
मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
स्तोत्रसंहिता 77 : 13 (IRVMR)
हे देवा, तुझे मार्ग पवित्र * चमत्कारीक आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
स्तोत्रसंहिता 77 : 14 (IRVMR)
अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
स्तोत्रसंहिता 77 : 15 (IRVMR)
याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
स्तोत्रसंहिता 77 : 16 (IRVMR)
हे देवा, जलाने तुला पाहिले, जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल जले कंपित झाली.
स्तोत्रसंहिता 77 : 17 (IRVMR)
मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटले; तुझे बाणही चमकू लागले.
स्तोत्रसंहिता 77 : 18 (IRVMR)
तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली; विजांनी जग प्रकाशमय केले; पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
स्तोत्रसंहिता 77 : 19 (IRVMR)
समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
स्तोत्रसंहिता 77 : 20 (IRVMR)
मोशे आणि अहरोन याच्या हाताने तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20