स्तोत्रसंहिता 8 : 1 (IRVMR)
देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी *मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
स्तोत्रसंहिता 8 : 2 (IRVMR)
तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.
स्तोत्रसंहिता 8 : 3 (IRVMR)
तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.
स्तोत्रसंहिता 8 : 4 (IRVMR)
तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
स्तोत्रसंहिता 8 : 5 (IRVMR)
तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा* देवदूतांपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.
स्तोत्रसंहिता 8 : 6 (IRVMR)
तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.
स्तोत्रसंहिता 8 : 7 (IRVMR)
सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
स्तोत्रसंहिता 8 : 8 (IRVMR)
आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.
स्तोत्रसंहिता 8 : 9 (IRVMR)
हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!

1 2 3 4 5 6 7 8 9