स्तोत्रसंहिता 81 : 1 (IRVMR)
देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा आसाफाचे स्तोत्र देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.
स्तोत्रसंहिता 81 : 2 (IRVMR)
गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा.
स्तोत्रसंहिता 81 : 3 (IRVMR)
नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
स्तोत्रसंहिता 81 : 4 (IRVMR)
कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.
स्तोत्रसंहिता 81 : 5 (IRVMR)
जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.
स्तोत्रसंहिता 81 : 6 (IRVMR)
मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.
स्तोत्रसंहिता 81 : 7 (IRVMR)
तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.
स्तोत्रसंहिता 81 : 8 (IRVMR)
अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.
स्तोत्रसंहिता 81 : 9 (IRVMR)
तुझ्यामध्ये परके देव नसावेत; तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस.
स्तोत्रसंहिता 81 : 10 (IRVMR)
मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.
स्तोत्रसंहिता 81 : 11 (IRVMR)
परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.
स्तोत्रसंहिता 81 : 12 (IRVMR)
म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले, अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.
स्तोत्रसंहिता 81 : 13 (IRVMR)
अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल!
स्तोत्रसंहिता 81 : 14 (IRVMR)
मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.
स्तोत्रसंहिता 81 : 15 (IRVMR)
परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील. ते सर्वकाळ अपमानीत राहतील.
स्तोत्रसंहिता 81 : 16 (IRVMR)
मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन; मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16