स्तोत्रसंहिता 82 : 1 (IRVMR)
{विपरीत न्यायाला दूषण देणे} [PS] देव दैवी मंडळीत उभा आहे, [QBR] तो देवांच्यामध्ये [* स्वर्गीय जनांमध्ये] न्याय देतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 2 (IRVMR)
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? [QBR] आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 3 (IRVMR)
गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; [QBR] त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 4 (IRVMR)
त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 5 (IRVMR)
“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; [QBR] ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; [QBR] पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.” [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 6 (IRVMR)
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, [QBR] आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.” [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 7 (IRVMR)
तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, [QBR] आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल. [QBR]
स्तोत्रसंहिता 82 : 8 (IRVMR)
हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, [QBR] कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील. [PE]

1 2 3 4 5 6 7 8

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: