स्तोत्रसंहिता 82 : 1 (IRVMR)
विपरीत न्यायाला दूषण देणे आसाफाचे स्तोत्र देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये * स्वर्गीय जनांमध्ये न्याय देतो.
स्तोत्रसंहिता 82 : 2 (IRVMR)
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
स्तोत्रसंहिता 82 : 3 (IRVMR)
गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
स्तोत्रसंहिता 82 : 4 (IRVMR)
त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
स्तोत्रसंहिता 82 : 5 (IRVMR)
“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
स्तोत्रसंहिता 82 : 6 (IRVMR)
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
स्तोत्रसंहिता 82 : 7 (IRVMR)
तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
स्तोत्रसंहिता 82 : 8 (IRVMR)
हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.

1 2 3 4 5 6 7 8