स्तोत्रसंहिता 83 : 1 (IRVMR)
इस्त्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना आसाफाचे स्तोत्र हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.
स्तोत्रसंहिता 83 : 2 (IRVMR)
पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
स्तोत्रसंहिता 83 : 3 (IRVMR)
ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
स्तोत्रसंहिता 83 : 4 (IRVMR)
ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
स्तोत्रसंहिता 83 : 5 (IRVMR)
त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
स्तोत्रसंहिता 83 : 6 (IRVMR)
ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
स्तोत्रसंहिता 83 : 7 (IRVMR)
गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
स्तोत्रसंहिता 83 : 8 (IRVMR)
अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
स्तोत्रसंहिता 83 : 9 (IRVMR)
तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
स्तोत्रसंहिता 83 : 10 (IRVMR)
ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.
स्तोत्रसंहिता 83 : 11 (IRVMR)
तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
स्तोत्रसंहिता 83 : 12 (IRVMR)
ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
स्तोत्रसंहिता 83 : 13 (IRVMR)
हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
स्तोत्रसंहिता 83 : 14 (IRVMR)
अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
स्तोत्रसंहिता 83 : 15 (IRVMR)
तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
स्तोत्रसंहिता 83 : 16 (IRVMR)
हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.
स्तोत्रसंहिता 83 : 17 (IRVMR)
ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते लज्जित होऊन नष्ट होवोत.
स्तोत्रसंहिता 83 : 18 (IRVMR)
नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18