स्तोत्रसंहिता 84 : 1 (IRVMR)
{देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ} [PS] हे सेनाधीश परमेश्वरा, [QBR] तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 2 (IRVMR)
माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; [QBR] माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 3 (IRVMR)
हे सेनाधीश परमेश्वरा, [QBR] माझ्या राजा, माझ्या देवा, [QBR] तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर [QBR] आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 4 (IRVMR)
जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; [QBR] ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 5 (IRVMR)
ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, [QBR] ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 6 (IRVMR)
शोकाच्या [* बाका] खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. [QBR] आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 7 (IRVMR)
ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; [QBR] त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 8 (IRVMR)
हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; [QBR] याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 9 (IRVMR)
हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, [QBR] तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 10 (IRVMR)
तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; [QBR] दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 11 (IRVMR)
कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; [QBR] परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; [QBR] जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 84 : 12 (IRVMR)
हे सेनाधीश परमेश्वरा, [QBR] जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: