स्तोत्रसंहिता 85 : 1 (IRVMR)
देवाने इस्त्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थना कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
स्तोत्रसंहिता 85 : 2 (IRVMR)
तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
स्तोत्रसंहिता 85 : 3 (IRVMR)
तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
स्तोत्रसंहिता 85 : 4 (IRVMR)
हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
स्तोत्रसंहिता 85 : 5 (IRVMR)
सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
स्तोत्रसंहिता 85 : 6 (IRVMR)
तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
स्तोत्रसंहिता 85 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
स्तोत्रसंहिता 85 : 8 (IRVMR)
परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
स्तोत्रसंहिता 85 : 9 (IRVMR)
खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
स्तोत्रसंहिता 85 : 10 (IRVMR)
दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
स्तोत्रसंहिता 85 : 11 (IRVMR)
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
स्तोत्रसंहिता 85 : 12 (IRVMR)
जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
स्तोत्रसंहिता 85 : 13 (IRVMR)
त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13