स्तोत्रसंहिता 85 : 1 (IRVMR)
{देवाने इस्त्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; [QBR] तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 2 (IRVMR)
तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. [QBR] तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 3 (IRVMR)
तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; [QBR] आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 4 (IRVMR)
हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, [QBR] आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 5 (IRVMR)
सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? [QBR] पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय? [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 6 (IRVMR)
तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, [QBR] म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का? [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; [QBR] तू कबूल केलेले तारण आम्हास दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 8 (IRVMR)
परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. [QBR] कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, [QBR] तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 9 (IRVMR)
खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; [QBR] यासाठी आमच्या देशात वैभव रहावे. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 10 (IRVMR)
दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; [QBR] निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 11 (IRVMR)
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, [QBR] आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 12 (IRVMR)
जे उत्तम ते परमेश्वर देईल, [QBR] आणि आमची भूमी आपले पिक देईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 85 : 13 (IRVMR)
त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, [QBR] आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील. [PE]
❮
❯