स्तोत्रसंहिता 86 : 1 (IRVMR)
देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना दाविदाची प्रार्थना हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे, कारण मी दीन आणि दरिद्री आहे.
स्तोत्रसंहिता 86 : 2 (IRVMR)
माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 86 : 3 (IRVMR)
हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.
स्तोत्रसंहिता 86 : 4 (IRVMR)
हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
स्तोत्रसंहिता 86 : 5 (IRVMR)
हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
स्तोत्रसंहिता 86 : 6 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
स्तोत्रसंहिता 86 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
स्तोत्रसंहिता 86 : 8 (IRVMR)
हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
स्तोत्रसंहिता 86 : 9 (IRVMR)
हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.
स्तोत्रसंहिता 86 : 10 (IRVMR)
कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; तूच फक्त देव आहेस.
स्तोत्रसंहिता 86 : 11 (IRVMR)
हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
स्तोत्रसंहिता 86 : 12 (IRVMR)
हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन.
स्तोत्रसंहिता 86 : 13 (IRVMR)
कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस.
स्तोत्रसंहिता 86 : 14 (IRVMR)
हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.
स्तोत्रसंहिता 86 : 15 (IRVMR)
तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
स्तोत्रसंहिता 86 : 16 (IRVMR)
तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे; आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.
स्तोत्रसंहिता 86 : 17 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव. कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे. मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17