स्तोत्रसंहिता 87 : 1 (IRVMR)
{सीयोनेत राहण्याचा मान} [PS] परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 87 : 2 (IRVMR)
याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास [QBR] सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 87 : 3 (IRVMR)
हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 87 : 4 (IRVMR)
राहाब [* मिसर देश] आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. [QBR] पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच. [QBR]
स्तोत्रसंहिता 87 : 5 (IRVMR)
सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; [QBR] आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. [QBR]
स्तोत्रसंहिता 87 : 6 (IRVMR)
लोकांची नोंदणी करताना, [QBR] ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील. [QBR]
स्तोत्रसंहिता 87 : 7 (IRVMR)
गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, [QBR] माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.” [PE]

1 2 3 4 5 6 7

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: