स्तोत्रसंहिता 88 : 1 (IRVMR)
{मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, [QBR] मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 2 (IRVMR)
माझी प्रार्थना ऐक; [QBR] माझ्या आरोळीकडे लक्ष दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 3 (IRVMR)
कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, [QBR] आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 4 (IRVMR)
खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; [QBR] मी असहाय्य मनुष्यासारखा आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 5 (IRVMR)
मला मृतामध्ये सोडून दिले आहे; [QBR] अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, [QBR] ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, [QBR] ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 6 (IRVMR)
तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, [QBR] काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 7 (IRVMR)
तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, [QBR] आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 8 (IRVMR)
तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. [QBR] त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; [QBR] मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 9 (IRVMR)
कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; [QBR] हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. [QBR] मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 10 (IRVMR)
तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? [QBR] जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय? [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 11 (IRVMR)
तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा [QBR] मृतांच्या जागी घोषणा होईल का? [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 12 (IRVMR)
तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात [QBR] किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय? [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 13 (IRVMR)
परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; [QBR] सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 14 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? [QBR] तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 15 (IRVMR)
मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; [QBR] मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 16 (IRVMR)
तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, [QBR] आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 17 (IRVMR)
त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; [QBR] त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 88 : 18 (IRVMR)
तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. [QBR] माझा परिचयाचा केवळ काळोख आहे. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: