स्तोत्रसंहिता 89 : 1 (IRVMR)
देवाचा दाविदाशी करार एथानाचे स्तोत्र मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
स्तोत्रसंहिता 89 : 2 (IRVMR)
कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल; तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.
स्तोत्रसंहिता 89 : 3 (IRVMR)
मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे, मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 4 (IRVMR)
मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.
स्तोत्रसंहिता 89 : 5 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील, तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
स्तोत्रसंहिता 89 : 6 (IRVMR)
कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
स्तोत्रसंहिता 89 : 7 (IRVMR)
पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 8 (IRVMR)
हे सेनाधीश देवा, परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
स्तोत्रसंहिता 89 : 9 (IRVMR)
समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस; जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
स्तोत्रसंहिता 89 : 10 (IRVMR)
तू राहाबाला * समुद्र प्राणी ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 11 (IRVMR)
आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 12 (IRVMR)
उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर † गालील सरोवराच्या दक्षिण टोकावरील पश्चिमेकडील पर्वत आणि हर्मोन ‡ गालील सरोवराच्या ईशान्येकडील पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
स्तोत्रसंहिता 89 : 13 (IRVMR)
तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 14 (IRVMR)
निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
स्तोत्रसंहिता 89 : 15 (IRVMR)
जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
स्तोत्रसंहिता 89 : 16 (IRVMR)
ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात, आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
स्तोत्रसंहिता 89 : 17 (IRVMR)
त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस, आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
स्तोत्रसंहिता 89 : 18 (IRVMR)
कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 19 (IRVMR)
पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 20 (IRVMR)
मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 21 (IRVMR)
माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
स्तोत्रसंहिता 89 : 22 (IRVMR)
कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 89 : 23 (IRVMR)
मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
स्तोत्रसंहिता 89 : 24 (IRVMR)
माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
स्तोत्रसंहिता 89 : 25 (IRVMR)
मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
स्तोत्रसंहिता 89 : 26 (IRVMR)
तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
स्तोत्रसंहिता 89 : 27 (IRVMR)
आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
स्तोत्रसंहिता 89 : 28 (IRVMR)
मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
स्तोत्रसंहिता 89 : 29 (IRVMR)
त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
स्तोत्रसंहिता 89 : 30 (IRVMR)
जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
स्तोत्रसंहिता 89 : 31 (IRVMR)
जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
स्तोत्रसंहिता 89 : 32 (IRVMR)
मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
स्तोत्रसंहिता 89 : 33 (IRVMR)
परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
स्तोत्रसंहिता 89 : 34 (IRVMR)
मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 35 (IRVMR)
एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
स्तोत्रसंहिता 89 : 36 (IRVMR)
त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
स्तोत्रसंहिता 89 : 37 (IRVMR)
ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
स्तोत्रसंहिता 89 : 38 (IRVMR)
पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 39 (IRVMR)
तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
स्तोत्रसंहिता 89 : 40 (IRVMR)
तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 41 (IRVMR)
सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
स्तोत्रसंहिता 89 : 42 (IRVMR)
तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
स्तोत्रसंहिता 89 : 43 (IRVMR)
तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
स्तोत्रसंहिता 89 : 44 (IRVMR)
तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
स्तोत्रसंहिता 89 : 45 (IRVMR)
तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
स्तोत्रसंहिता 89 : 46 (IRVMR)
हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
स्तोत्रसंहिता 89 : 47 (IRVMR)
माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
स्तोत्रसंहिता 89 : 48 (IRVMR)
कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?
स्तोत्रसंहिता 89 : 49 (IRVMR)
हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
स्तोत्रसंहिता 89 : 50 (IRVMR)
हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
स्तोत्रसंहिता 89 : 51 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
स्तोत्रसंहिता 89 : 52 (IRVMR)
परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.
❮
❯