स्तोत्रसंहिता 9 : 1 (IRVMR)
देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती *प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
स्तोत्रसंहिता 9 : 2 (IRVMR)
तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
स्तोत्रसंहिता 9 : 3 (IRVMR)
माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
स्तोत्रसंहिता 9 : 4 (IRVMR)
कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 5 (IRVMR)
आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 6 (IRVMR)
जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 7 (IRVMR)
परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 8 (IRVMR)
तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 9 (IRVMR)
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 10 (IRVMR)
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
स्तोत्रसंहिता 9 : 11 (IRVMR)
सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
स्तोत्रसंहिता 9 : 12 (IRVMR)
कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
स्तोत्रसंहिता 9 : 13 (IRVMR)
परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
स्तोत्रसंहिता 9 : 14 (IRVMR)
म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; सियोन कन्येच्या दाराजवळ मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
स्तोत्रसंहिता 9 : 15 (IRVMR)
राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
स्तोत्रसंहिता 9 : 16 (IRVMR)
परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
स्तोत्रसंहिता 9 : 17 (IRVMR)
दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
स्तोत्रसंहिता 9 : 18 (IRVMR)
कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
स्तोत्रसंहिता 9 : 19 (IRVMR)
हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
स्तोत्रसंहिता 9 : 20 (IRVMR)
परमेश्वरा त्यांना भयभीत कर; राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. QSS सेला. SE
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20