स्तोत्रसंहिता 9 : 1 (IRVMR)
{देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती} [PS] मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; [QBR] मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 2 (IRVMR)
तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, [QBR] हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 3 (IRVMR)
माझे शत्रू माघारी फिरतात, [QBR] तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 4 (IRVMR)
कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. [QBR] तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 5 (IRVMR)
आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; [QBR] तू दुष्टाचा नाश केला आहेस. [QBR] तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 6 (IRVMR)
जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, [QBR] तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. [QBR] त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 7 (IRVMR)
परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; [QBR] त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 8 (IRVMR)
तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, [QBR] राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 9 (IRVMR)
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, [QBR] संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 10 (IRVMR)
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. [QBR] कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 11 (IRVMR)
सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. [QBR] ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 12 (IRVMR)
कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. [QBR] तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 13 (IRVMR)
परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 14 (IRVMR)
म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; [QBR] सियोन कन्येच्या दाराजवळ [QBR] मी तुझ्या तारणात हर्ष करीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 15 (IRVMR)
राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; [QBR] त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 16 (IRVMR)
परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 17 (IRVMR)
दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, [QBR] जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 18 (IRVMR)
कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. [QBR] किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 19 (IRVMR)
हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; [QBR] राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 9 : 20 (IRVMR)
परमेश्वरा त्यांना भयभीत कर; [QBR] राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला. [PE]
❮
❯