स्तोत्रसंहिता 90 : 1 (IRVMR)
देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता मोशेचे स्तोत्र हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या* एल-ओलाम आमचे निवासस्थान आहेस.
स्तोत्रसंहिता 90 : 2 (IRVMR)
पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
स्तोत्रसंहिता 90 : 3 (IRVMR)
तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
स्तोत्रसंहिता 90 : 4 (IRVMR)
कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
स्तोत्रसंहिता 90 : 5 (IRVMR)
पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
स्तोत्रसंहिता 90 : 6 (IRVMR)
सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
स्तोत्रसंहिता 90 : 7 (IRVMR)
खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
स्तोत्रसंहिता 90 : 8 (IRVMR)
तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
स्तोत्रसंहिता 90 : 9 (IRVMR)
तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
स्तोत्रसंहिता 90 : 10 (IRVMR)
आमचे आयुष्य † प्रताप सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
स्तोत्रसंहिता 90 : 11 (IRVMR)
तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
स्तोत्रसंहिता 90 : 12 (IRVMR)
म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
स्तोत्रसंहिता 90 : 13 (IRVMR)
हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.
स्तोत्रसंहिता 90 : 14 (IRVMR)
तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
स्तोत्रसंहिता 90 : 15 (IRVMR)
जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
स्तोत्रसंहिता 90 : 16 (IRVMR)
तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
स्तोत्रसंहिता 90 : 17 (IRVMR)
प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17