स्तोत्रसंहिता 91 : 1 (IRVMR)
सर्वसामर्थ्याच्या पंखांखाली आश्रय जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
स्तोत्रसंहिता 91 : 2 (IRVMR)
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
स्तोत्रसंहिता 91 : 3 (IRVMR)
कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
स्तोत्रसंहिता 91 : 4 (IRVMR)
तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
स्तोत्रसंहिता 91 : 5 (IRVMR)
रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,
स्तोत्रसंहिता 91 : 6 (IRVMR)
किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
स्तोत्रसंहिता 91 : 7 (IRVMR)
तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
स्तोत्रसंहिता 91 : 8 (IRVMR)
तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.
स्तोत्रसंहिता 91 : 9 (IRVMR)
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.
स्तोत्रसंहिता 91 : 10 (IRVMR)
तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
स्तोत्रसंहिता 91 : 11 (IRVMR)
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
स्तोत्रसंहिता 91 : 12 (IRVMR)
ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
स्तोत्रसंहिता 91 : 13 (IRVMR)
तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
स्तोत्रसंहिता 91 : 14 (IRVMR)
तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.
स्तोत्रसंहिता 91 : 15 (IRVMR)
जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
स्तोत्रसंहिता 91 : 16 (IRVMR)
मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16