स्तोत्रसंहिता 91 : 1 (IRVMR)
{सर्वसामर्थ्याच्या पंखांखाली आश्रय} [PS] जो परात्पराच्या आश्रयात राहतो, [QBR] तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 2 (IRVMR)
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, [QBR] माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.” [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 3 (IRVMR)
कारण तो तुला पारध्याच्या पाशातून [QBR] आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 4 (IRVMR)
तो तुला आपल्या पंखानी झाकील, [QBR] आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. [QBR] त्याचे सत्य ढाल व कवच आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 5 (IRVMR)
रात्रीच्या दहशतीचे भय, [QBR] किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 6 (IRVMR)
किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला [QBR] किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 7 (IRVMR)
तुझ्या एका बाजूला हजार पडले, [QBR] आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, [QBR] पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 8 (IRVMR)
तू मात्र निरीक्षण करशील, [QBR] आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 9 (IRVMR)
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे [QBR] असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 10 (IRVMR)
तुमच्यावर वाईट मात करणार नाही. [QBR] तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 11 (IRVMR)
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, [QBR] तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 12 (IRVMR)
ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील [QBR] अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 13 (IRVMR)
तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; [QBR] तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 14 (IRVMR)
तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; [QBR] मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 15 (IRVMR)
जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; [QBR] संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; [QBR] मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 91 : 16 (IRVMR)
मी त्यास दीर्घायुष्य देईन, [QBR] आणि त्यास माझे तारण दाखवीन. [PE]
❮
❯