स्तोत्रसंहिता 92 : 1 (IRVMR)
देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती शब्बाथ दिवसाचे स्तोत्र परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
स्तोत्रसंहिता 92 : 2 (IRVMR)
सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.
स्तोत्रसंहिता 92 : 3 (IRVMR)
दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.
स्तोत्रसंहिता 92 : 4 (IRVMR)
कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.
स्तोत्रसंहिता 92 : 5 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.
स्तोत्रसंहिता 92 : 6 (IRVMR)
पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,
स्तोत्रसंहिता 92 : 7 (IRVMR)
दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.
स्तोत्रसंहिता 92 : 8 (IRVMR)
परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.
स्तोत्रसंहिता 92 : 9 (IRVMR)
हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.
स्तोत्रसंहिता 92 : 10 (IRVMR)
पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
स्तोत्रसंहिता 92 : 11 (IRVMR)
माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
स्तोत्रसंहिता 92 : 12 (IRVMR)
नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
स्तोत्रसंहिता 92 : 13 (IRVMR)
जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
स्तोत्रसंहिता 92 : 14 (IRVMR)
वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
स्तोत्रसंहिता 92 : 15 (IRVMR)
हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15