स्तोत्रसंहिता 93 : 1 (IRVMR)
{परमेश्वराचे माहत्म्य} [PS] परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; [QBR] परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. [QBR] जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 93 : 2 (IRVMR)
तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; [QBR] तू सर्वकाळापासून आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 93 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; [QBR] आपला आवाज उंचावला आहे, [QBR] महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 93 : 4 (IRVMR)
खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड [QBR] लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला [QBR] परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 93 : 5 (IRVMR)
तुझे नियम अतिसत्य आहेत; [QBR] हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता [QBR] सदासर्वकाळ शोभते. [PE]

1 2 3 4 5

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: