स्तोत्रसंहिता 94 : 1 (IRVMR)
दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज* आपला क्रोध प्रगट कर.
स्तोत्रसंहिता 94 : 2 (IRVMR)
पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.
स्तोत्रसंहिता 94 : 3 (IRVMR)
हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
स्तोत्रसंहिता 94 : 4 (IRVMR)
ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात आणि फुशारकी मारतात.
स्तोत्रसंहिता 94 : 5 (IRVMR)
हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
स्तोत्रसंहिता 94 : 6 (IRVMR)
ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, आणि ते अनाथांचा खून करतात.
स्तोत्रसंहिता 94 : 7 (IRVMR)
ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही.
स्तोत्रसंहिता 94 : 8 (IRVMR)
अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
स्तोत्रसंहिता 94 : 9 (IRVMR)
ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
स्तोत्रसंहिता 94 : 10 (IRVMR)
जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का?
स्तोत्रसंहिता 94 : 11 (IRVMR)
परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत.
स्तोत्रसंहिता 94 : 12 (IRVMR)
हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
स्तोत्रसंहिता 94 : 13 (IRVMR)
दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
स्तोत्रसंहिता 94 : 14 (IRVMR)
कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
स्तोत्रसंहिता 94 : 15 (IRVMR)
कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
स्तोत्रसंहिता 94 : 16 (IRVMR)
माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
स्तोत्रसंहिता 94 : 17 (IRVMR)
जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
स्तोत्रसंहिता 94 : 18 (IRVMR)
जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
स्तोत्रसंहिता 94 : 19 (IRVMR)
जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
स्तोत्रसंहिता 94 : 20 (IRVMR)
जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
स्तोत्रसंहिता 94 : 21 (IRVMR)
ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
स्तोत्रसंहिता 94 : 22 (IRVMR)
परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
स्तोत्रसंहिता 94 : 23 (IRVMR)
त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23