स्तोत्रसंहिता 95 : 1 (IRVMR)
उपकारस्मरणाचे गीत याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
स्तोत्रसंहिता 95 : 2 (IRVMR)
उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
स्तोत्रसंहिता 95 : 3 (IRVMR)
कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
स्तोत्रसंहिता 95 : 4 (IRVMR)
त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
स्तोत्रसंहिता 95 : 5 (IRVMR)
समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
स्तोत्रसंहिता 95 : 6 (IRVMR)
याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
स्तोत्रसंहिता 95 : 7 (IRVMR)
कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
स्तोत्रसंहिता 95 : 8 (IRVMR)
मरीबा * कलह येथल्याप्रमाणे किंवा मस्सा † परीक्षा च्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,
स्तोत्रसंहिता 95 : 9 (IRVMR)
तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
स्तोत्रसंहिता 95 : 10 (IRVMR)
चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत .
स्तोत्रसंहिता 95 : 11 (IRVMR)
म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11