स्तोत्रसंहिता 96 : 1 (IRVMR)
उपकारस्तुतीचे गीत
1 इति. 16:23-33
अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
स्तोत्रसंहिता 96 : 2 (IRVMR)
परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
स्तोत्रसंहिता 96 : 3 (IRVMR)
राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
स्तोत्रसंहिता 96 : 4 (IRVMR)
कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
स्तोत्रसंहिता 96 : 5 (IRVMR)
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
स्तोत्रसंहिता 96 : 6 (IRVMR)
वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
स्तोत्रसंहिता 96 : 7 (IRVMR)
अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
स्तोत्रसंहिता 96 : 8 (IRVMR)
परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
स्तोत्रसंहिता 96 : 9 (IRVMR)
पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
स्तोत्रसंहिता 96 : 10 (IRVMR)
राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
स्तोत्रसंहिता 96 : 11 (IRVMR)
आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
स्तोत्रसंहिता 96 : 12 (IRVMR)
शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
स्तोत्रसंहिता 96 : 13 (IRVMR)
सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13