स्तोत्रसंहिता 97 : 1 (IRVMR)
{देवाचे राज्य व सामर्थ्य} [PS] परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. [QBR] अनेक द्वीपसमूह आनंदित होवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 2 (IRVMR)
ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. [QBR] निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत [* परमेश्वर नीतीने आणि न्यायाने राज्य करतो] . [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 3 (IRVMR)
अग्नी त्याच्यापुढे चालतो, [QBR] आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 4 (IRVMR)
त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; [QBR] पृथ्वी हे पाहून थरथर कापली. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 5 (IRVMR)
परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर [QBR] पर्वत मेणासारखे वितळले. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 6 (IRVMR)
आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, [QBR] आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 7 (IRVMR)
जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, [QBR] जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. [QBR] अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 8 (IRVMR)
सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, [QBR] कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे [QBR] यहूदाच्या नगरांनी आनंद केला. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 9 (IRVMR)
कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. [QBR] तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 10 (IRVMR)
जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, [QBR] तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, [QBR] आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 11 (IRVMR)
नितीमानासाठी प्रकाश [QBR] आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 97 : 12 (IRVMR)
अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. [QBR] त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: