स्तोत्रसंहिता 97 : 1 (IRVMR)
देवाचे राज्य व सामर्थ्य परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
स्तोत्रसंहिता 97 : 2 (IRVMR)
ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत* परमेश्वर नीतीने आणि न्यायाने राज्य करतो .
स्तोत्रसंहिता 97 : 3 (IRVMR)
अग्नी त्याच्यापुढे चालतो, आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
स्तोत्रसंहिता 97 : 4 (IRVMR)
त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
स्तोत्रसंहिता 97 : 5 (IRVMR)
परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणासारखे वितळले.
स्तोत्रसंहिता 97 : 6 (IRVMR)
आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.
स्तोत्रसंहिता 97 : 7 (IRVMR)
जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.
स्तोत्रसंहिता 97 : 8 (IRVMR)
सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
स्तोत्रसंहिता 97 : 9 (IRVMR)
कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.
स्तोत्रसंहिता 97 : 10 (IRVMR)
जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
स्तोत्रसंहिता 97 : 11 (IRVMR)
नितीमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
स्तोत्रसंहिता 97 : 12 (IRVMR)
अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12