स्तोत्रसंहिता 98 : 1 (IRVMR)
देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
स्तोत्रसंहिता 98 : 2 (IRVMR)
परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
स्तोत्रसंहिता 98 : 3 (IRVMR)
त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
स्तोत्रसंहिता 98 : 4 (IRVMR)
अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
स्तोत्रसंहिता 98 : 5 (IRVMR)
परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
स्तोत्रसंहिता 98 : 6 (IRVMR)
कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
स्तोत्रसंहिता 98 : 7 (IRVMR)
समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
स्तोत्रसंहिता 98 : 8 (IRVMR)
नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
स्तोत्रसंहिता 98 : 9 (IRVMR)
परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.

1 2 3 4 5 6 7 8 9