स्तोत्रसंहिता 98 : 1 (IRVMR)
{देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती} [PS] परमेश्वरास नवीन गीत गा, [QBR] कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; [QBR] त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 2 (IRVMR)
परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; [QBR] त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 3 (IRVMR)
त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; [QBR] पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 4 (IRVMR)
अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; [QBR] उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 5 (IRVMR)
परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, [QBR] वीणेवर मधुर स्वराने गायन करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 6 (IRVMR)
कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, [QBR] परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 7 (IRVMR)
समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, [QBR] जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 8 (IRVMR)
नद्या टाळ्या वाजवोत, [QBR] आणि पर्वत हर्षनाद करोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 98 : 9 (IRVMR)
परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; [QBR] तो न्यायीपणाने जगाचा [QBR] आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: