प्रकटीकरण 10 : 1 (IRVMR)
बलवान दूत व लहानसे पुस्तक मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते,
प्रकटीकरण 10 : 2 (IRVMR)
त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला;
प्रकटीकरण 10 : 3 (IRVMR)
आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.
प्रकटीकरण 10 : 4 (IRVMR)
प्रकटीकरण 10 : 5 (IRVMR)
त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला,
प्रकटीकरण 10 : 6 (IRVMR)
आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही;
प्रकटीकरण 10 : 7 (IRVMR)
परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल.
प्रकटीकरण 10 : 8 (IRVMR)
स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे.
प्रकटीकरण 10 : 9 (IRVMR)
तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”
प्रकटीकरण 10 : 10 (IRVMR)
तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.
प्रकटीकरण 10 : 11 (IRVMR)
तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11