प्रकटीकरण 12 : 1 (IRVMR)
{स्त्री व अजगर} [PS] आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.
प्रकटीकरण 12 : 2 (IRVMR)
ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती. [PE][PS]
प्रकटीकरण 12 : 3 (IRVMR)
आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.
प्रकटीकरण 12 : 4 (IRVMR)
त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला.
प्रकटीकरण 12 : 5 (IRVMR)
आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले.
प्रकटीकरण 12 : 6 (IRVMR)
आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे. [PE][PS]
प्रकटीकरण 12 : 7 (IRVMR)
आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले.
प्रकटीकरण 12 : 8 (IRVMR)
पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही.
प्रकटीकरण 12 : 9 (IRVMR)
तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले. [PE][PS]
प्रकटीकरण 12 : 10 (IRVMR)
आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; [QBR] त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य [QBR2] आणि राज्य आले आहे. [QBR] आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; [QBR2] कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर [QBR] रात्रंदिवस आरोप करीत असे, [QBR2] तो खाली टाकण्यात आला आहे. [QBR]
प्रकटीकरण 12 : 11 (IRVMR)
त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. [QBR] आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. [QBR]
प्रकटीकरण 12 : 12 (IRVMR)
म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी [QBR2] आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, [QBR] कारण सैतान खाली तुमच्याकडे [QBR] मोठ्या रागाने आला आहे. [QBR] कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो. [PE][PS]
प्रकटीकरण 12 : 13 (IRVMR)
आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.
प्रकटीकरण 12 : 14 (IRVMR)
परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल.
प्रकटीकरण 12 : 15 (IRVMR)
आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले.
प्रकटीकरण 12 : 16 (IRVMR)
पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली.
प्रकटीकरण 12 : 17 (IRVMR)
तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला; [17] आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: