प्रकटीकरण 14 : 1 (IRVMR)
{कोकरा व त्याचे अनुयायी} [PS] नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.
प्रकटीकरण 14 : 2 (IRVMR)
आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती.
प्रकटीकरण 14 : 3 (IRVMR)
ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.
प्रकटीकरण 14 : 4 (IRVMR)
स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकऱ्याला प्रथमफळ असे आहेत.
प्रकटीकरण 14 : 5 (IRVMR)
त्यांच्या मुखात काही असत्य आढळले नाही; ते निष्कलंक आहेत. [PS]
प्रकटीकरण 14 : 6 (IRVMR)
{तीन स्वर्गदूत आणि संदेश} [PS] यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती.
प्रकटीकरण 14 : 7 (IRVMR)
तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा. [PE][PS]
प्रकटीकरण 14 : 8 (IRVMR)
मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे.” [PE][PS]
प्रकटीकरण 14 : 9 (IRVMR)
आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेईल
प्रकटीकरण 14 : 10 (IRVMR)
तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल.
प्रकटीकरण 14 : 11 (IRVMR)
त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर चढत राहतो; त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही. [PE][PS]
प्रकटीकरण 14 : 12 (IRVMR)
जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे. [PE][PS]
प्रकटीकरण 14 : 13 (IRVMR)
आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.” [PS]
प्रकटीकरण 14 : 14 (IRVMR)
{हंगाम व पृथ्वीची कापणी} [PS] तेव्हा मी बघितले आणि पाहा, एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता.
प्रकटीकरण 14 : 15 (IRVMR)
मग परमेश्वराच्या भवनातून आणखी एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, “विळा चालव आणि कापणी कर कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे; कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.”
प्रकटीकरण 14 : 16 (IRVMR)
मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. [PE][PS]
प्रकटीकरण 14 : 17 (IRVMR)
मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता.
प्रकटीकरण 14 : 18 (IRVMR)
मग आणखी एक देवदूत वेदीतून बाहेर आला; त्यास अग्नीवर अधिकार होता; आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षवेलीचे घड गोळा कर; कारण तिची द्राक्षे पिकली आहेत.”
प्रकटीकरण 14 : 19 (IRVMR)
तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.
प्रकटीकरण 14 : 20 (IRVMR)
यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: