प्रकटीकरण 9 : 1 (IRVMR)
मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती.
प्रकटीकरण 9 : 2 (IRVMR)
त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली.
प्रकटीकरण 9 : 3 (IRVMR)
त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती.
प्रकटीकरण 9 : 4 (IRVMR)
यांना असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका; परंतु ज्या मनुष्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा.
प्रकटीकरण 9 : 5 (IRVMR)
त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती.
प्रकटीकरण 9 : 6 (IRVMR)
त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल.
प्रकटीकरण 9 : 7 (IRVMR)
टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते.
प्रकटीकरण 9 : 8 (IRVMR)
त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
प्रकटीकरण 9 : 9 (IRVMR)
त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता;
प्रकटीकरण 9 : 10 (IRVMR)
त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे.
प्रकटीकरण 9 : 11 (IRVMR)
अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे.
प्रकटीकरण 9 : 13 (IRVMR)
पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येणार आहेत. मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली.
प्रकटीकरण 9 : 14 (IRVMR)
ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड.
प्रकटीकरण 9 : 15 (IRVMR)
तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले.
प्रकटीकरण 9 : 16 (IRVMR)
घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.
प्रकटीकरण 9 : 17 (IRVMR)
त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.
प्रकटीकरण 9 : 18 (IRVMR)
त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला,
प्रकटीकरण 9 : 19 (IRVMR)
कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात.
प्रकटीकरण 9 : 20 (IRVMR)
त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही
प्रकटीकरण 9 : 21 (IRVMR)
आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21