रोमकरांस 10 : 1 (IRVMR)
इस्रालाएलाविषयी पौलाची मनीषा बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.
रोमकरांस 10 : 2 (IRVMR)
कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.
रोमकरांस 10 : 3 (IRVMR)
कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत.
रोमकरांस 10 : 4 (IRVMR)
नीतिमत्त्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.
रोमकरांस 10 : 5 (IRVMR)
कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’
रोमकरांस 10 : 6 (IRVMR)
पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)
रोमकरांस 10 : 7 (IRVMR)
किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास)
रोमकरांस 10 : 8 (IRVMR)
पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.
रोमकरांस 10 : 9 (IRVMR)
कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
रोमकरांस 10 : 10 (IRVMR)
कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
रोमकरांस 10 : 11 (IRVMR)
म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
रोमकरांस 10 : 12 (IRVMR)
यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,
रोमकरांस 10 : 13 (IRVMR)
‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
रोमकरांस 10 : 14 (IRVMR)
मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?
रोमकरांस 10 : 15 (IRVMR)
आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’
रोमकरांस 10 : 16 (IRVMR)
पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
रोमकरांस 10 : 17 (IRVMR)
तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
रोमकरांस 10 : 18 (IRVMR)
पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले; ‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’
रोमकरांस 10 : 19 (IRVMR)
पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, ‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून. मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’
रोमकरांस 10 : 20 (IRVMR)
पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’
रोमकरांस 10 : 21 (IRVMR)
पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्‍या आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21