रोमकरांस 14 : 1 (IRVMR)
विश्वासात दुर्बळ असलेल्यांशी सहिष्णुता जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
रोमकरांस 14 : 2 (IRVMR)
कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो.
रोमकरांस 14 : 3 (IRVMR)
जो खातो त्याने न खाणार्यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
रोमकरांस 14 : 4 (IRVMR)
दुसर्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
रोमकरांस 14 : 5 (IRVMR)
आणि कोणी एखादा दिवस दुसर्या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.
रोमकरांस 14 : 6 (IRVMR)
जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.
रोमकरांस 14 : 7 (IRVMR)
कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.
रोमकरांस 14 : 8 (IRVMR)
कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.
रोमकरांस 14 : 9 (IRVMR)
कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
रोमकरांस 14 : 10 (IRVMR)
मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
रोमकरांस 14 : 11 (IRVMR)
कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
रोमकरांस 14 : 12 (IRVMR)
तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
रोमकरांस 14 : 13 (IRVMR)
तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
रोमकरांस 14 : 14 (IRVMR)
मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे.
रोमकरांस 14 : 15 (IRVMR)
पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
रोमकरांस 14 : 16 (IRVMR)
म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.
रोमकरांस 14 : 17 (IRVMR)
कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
रोमकरांस 14 : 18 (IRVMR)
कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो.
रोमकरांस 14 : 19 (IRVMR)
तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.
रोमकरांस 14 : 20 (IRVMR)
अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.
रोमकरांस 14 : 21 (IRVMR)
मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.
रोमकरांस 14 : 22 (IRVMR)
तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.
रोमकरांस 14 : 23 (IRVMR)
पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23