रोमकरांस 15 : 1 (IRVMR)
{सशक्त व अशक्त} [PS] म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
रोमकरांस 15 : 2 (IRVMR)
आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्‍याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.
रोमकरांस 15 : 3 (IRVMR)
कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्‍यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले.
रोमकरांस 15 : 4 (IRVMR)
कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्‍या उत्तेजनाने आशा धरावी.
रोमकरांस 15 : 5 (IRVMR)
आता, जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;
रोमकरांस 15 : 6 (IRVMR)
म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे. [PS]
रोमकरांस 15 : 7 (IRVMR)
{परराष्ट्रीय} [PS] म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.
रोमकरांस 15 : 8 (IRVMR)
कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे,
रोमकरांस 15 : 9 (IRVMR)
आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, [QBR] ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, [QBR] आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’ [QBR]
रोमकरांस 15 : 10 (IRVMR)
आणि पुन्हा तो म्हणतो की, [QBR] ‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’
रोमकरांस 15 : 11 (IRVMR)
आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’ [PE][PS]
रोमकरांस 15 : 12 (IRVMR)
आणि पुन्हा, यशया म्हणतो की, [QBR] ‘इशायाला अंकुर फुटेल, [QBR] आणि जो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील; [QBR] त्याच्यावर परराष्ट्रे आशा ठेवतील.’ [PE][PS]
रोमकरांस 15 : 13 (IRVMR)
आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे. [PS]
रोमकरांस 15 : 14 (IRVMR)
{पौलाने प्रशस्तपणे लिहीण्याचे कारण} [PS] आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहात.
रोमकरांस 15 : 15 (IRVMR)
पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून, तुम्हास काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे.
रोमकरांस 15 : 16 (IRVMR)
ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
रोमकरांस 15 : 17 (IRVMR)
म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे.
रोमकरांस 15 : 18 (IRVMR)
कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही.
रोमकरांस 15 : 19 (IRVMR)
चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने; अशाप्रकारे मी यरूशलेम शहरापासून सभोवताली इल्लूरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे.
रोमकरांस 15 : 20 (IRVMR)
पण दुसर्‍याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास झटलो.
रोमकरांस 15 : 21 (IRVMR)
म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, [QBR] ‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील, [QBR] आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’ [PS]
रोमकरांस 15 : 22 (IRVMR)
{पौलाचे पुढील बेत} [PS] आणि म्हणून, तुमच्याकडे येण्यामध्ये मला पुष्कळ अडथळा आला.
रोमकरांस 15 : 23 (IRVMR)
पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे,
रोमकरांस 15 : 24 (IRVMR)
मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे.
रोमकरांस 15 : 25 (IRVMR)
पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे.
रोमकरांस 15 : 26 (IRVMR)
कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.
रोमकरांस 15 : 27 (IRVMR)
हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण त्यांच्या आत्मिक गोष्टींत जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत, तर दैहिक गोष्टींत त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
रोमकरांस 15 : 28 (IRVMR)
म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन, तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन.
रोमकरांस 15 : 29 (IRVMR)
आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन. [PS]
रोमकरांस 15 : 30 (IRVMR)
{प्रार्थना करण्याची विनंती} [PS] पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरिता व आत्म्याच्या प्रीती करिता, बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा;
रोमकरांस 15 : 31 (IRVMR)
म्हणजे, यहूदीयात जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि यरूशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनांस मान्य व्हावी;
रोमकरांस 15 : 32 (IRVMR)
म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे.
रोमकरांस 15 : 33 (IRVMR)
आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: