रोमकरांस 2 : 1 (IRVMR)
यहूदीही दोषी आहेत तेव्हा दुसर्याला दोष लावणार्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
रोमकरांस 2 : 2 (IRVMR)
पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.
रोमकरांस 2 : 3 (IRVMR)
तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?
रोमकरांस 2 : 4 (IRVMR)
किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
रोमकरांस 2 : 5 (IRVMR)
पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
रोमकरांस 2 : 6 (IRVMR)
तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.
रोमकरांस 2 : 7 (IRVMR)
म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;
रोमकरांस 2 : 8 (IRVMR)
परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप.
रोमकरांस 2 : 9 (IRVMR)
संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
रोमकरांस 2 : 10 (IRVMR)
पण प्रत्येक चांगले करणार्या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
रोमकरांस 2 : 11 (IRVMR)
कारण देवाजवळ पक्षपात नाही.
रोमकरांस 2 : 12 (IRVMR)
कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
रोमकरांस 2 : 13 (IRVMR)
कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.
रोमकरांस 2 : 14 (IRVMR)
कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात.
रोमकरांस 2 : 15 (IRVMR)
आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.
रोमकरांस 2 : 16 (IRVMR)
देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल.
रोमकरांस 2 : 17 (IRVMR)
आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस;
रोमकरांस 2 : 18 (IRVMR)
तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे;
रोमकरांस 2 : 19 (IRVMR)
आणि तुझी खातरी आहे की तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश,
रोमकरांस 2 : 20 (IRVMR)
अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;
रोमकरांस 2 : 21 (IRVMR)
तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?
रोमकरांस 2 : 22 (IRVMR)
व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?
रोमकरांस 2 : 23 (IRVMR)
जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?
रोमकरांस 2 : 24 (IRVMR)
कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे.
रोमकरांस 2 : 25 (IRVMR)
कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.
रोमकरांस 2 : 26 (IRVMR)
म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
रोमकरांस 2 : 27 (IRVMR)
आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?
रोमकरांस 2 : 28 (IRVMR)
कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.
रोमकरांस 2 : 29 (IRVMR)
कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29