रूथ 1 : 1 (IRVMR)
रूथ आणि नामी मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला आणि यहूदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला.
रूथ 1 : 2 (IRVMR)
त्या मनुष्याचे नाव अलीमलेख व त्याच्या पत्नीचे नाव नामी होते, आणि त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन होते. ते एफ्राथी म्हणजे यहूदा प्रांतातील बेथलेहेम नगरात होते. ते मवाब देशी राहायला गेले.
रूथ 1 : 3 (IRVMR)
नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली.
रूथ 1 : 4 (IRVMR)
त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले.
रूथ 1 : 5 (IRVMR)
मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली.
रूथ 1 : 6 (IRVMR)
परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जायला निघाली.
रूथ 1 : 7 (IRVMR)
ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जायला निघाली.
रूथ 1 : 8 (IRVMR)
नामी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मृतांवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो.
रूथ 1 : 9 (IRVMR)
परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या.
रूथ 1 : 10 (IRVMR)
त्या तिला म्हणाल्या, “नाही, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.”
रूथ 1 : 11 (IRVMR)
नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील?
रूथ 1 : 12 (IRVMR)
माझ्या मुलींनो माघारी जा; मी आता म्हातारी झाले आहे, पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले,
रूथ 1 : 13 (IRVMR)
तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे.”
रूथ 1 : 14 (IRVMR)
रूथ 1 : 15 (IRVMR)
मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली.
रूथ 1 : 16 (IRVMR)
ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका; तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे रहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव.
रूथ 1 : 17 (IRVMR)
तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.”
रूथ 1 : 18 (IRVMR)
रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले.
रूथ 1 : 19 (IRVMR)
मग त्या दोघी बेथलेहेमात पोहचल्या. बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, “हीच का ती नामी?”
रूथ 1 : 20 (IRVMR)
आणि ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मला मारा (दु:खदायक) म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे.
रूथ 1 : 21 (IRVMR)
मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खित केले आहे तर तुम्ही मला नामी का म्हणता?”
रूथ 1 : 22 (IRVMR)
याप्रमाणे नामी तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेम नगरात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22