गीतरत्न 3 : 1 (IRVMR)
{वधूचे विचार} [PS] (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, [QBR] ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, [QBR] त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; [QBR] पण तो मला सापडला नाही. [QBR]
गीतरत्न 3 : 2 (IRVMR)
मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, [QBR] रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. [QBR] मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
गीतरत्न 3 : 3 (IRVMR)
शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. [QBR] मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?” [QBR]
गीतरत्न 3 : 4 (IRVMR)
मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. [QBR] इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. [QBR] मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. [QBR] मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. [QBR] जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही. [QBR]
गीतरत्न 3 : 5 (IRVMR)
(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, [QBR] रानतल्या हरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मी शपथ घालून सांगते. [QBR] आमचे प्रेम करणे संपत नाही, [QBR] तोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणू नका.
गीतरत्न 3 : 6 (IRVMR)
{वरात} [PS] (ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील [QBR] सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने [QBR] अशी धुराच्या खांबासारखी, [QBR] रानातून येणारी ती ही कोण आहे? [QBR]
गीतरत्न 3 : 7 (IRVMR)
पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. [QBR] त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, [QBR] ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत. [QBR]
गीतरत्न 3 : 8 (IRVMR)
ते सगळे निपुण लढवय्ये व तलवारधारी आहेत. [QBR] रात्री येणाऱ्या कोणत्याही संकटाचा मुकाबला [QBR] करायला ते तयार आहेत. [QBR]
गीतरत्न 3 : 9 (IRVMR)
राजा शलमोनाने स्वत:साठी [QBR] लबानोनी लाकडाची पालखी तयार केली. [QBR]
गीतरत्न 3 : 10 (IRVMR)
त्याचे खांब चांदीचे केले. [QBR] पाठ सोन्याची केली. [QBR] बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली. [QBR] त्याचा अंतर्भाग यरूशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने सजवला आहे. [QBR]
गीतरत्न 3 : 11 (IRVMR)
(ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. [QBR] ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, [QBR] त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. [QBR] त्या दिवशी तो खूप आनंदी होता. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: