गीतरत्न 8 : 1 (IRVMR)
(तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या माझ्या बंधूसारखा तू असतास तर किती बरे होते. तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता.
गीतरत्न 8 : 2 (IRVMR)
मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते. तू मला शिकवले असते. मी तुला मसाला घातलेला द्राक्षरस आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता.
गीतरत्न 8 : 3 (IRVMR)
त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत असता.
गीतरत्न 8 : 4 (IRVMR)
(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या.
गीतरत्न 8 : 5 (IRVMR)
प्रेम मृत्यूसारखे प्रबळ (यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.
गीतरत्न 8 : 6 (IRVMR)
तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
गीतरत्न 8 : 7 (IRVMR)
असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती * तो त्यापुढे अगदी तुच्छ होय.
गीतरत्न 8 : 8 (IRVMR)
(त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?
गीतरत्न 8 : 9 (IRVMR)
ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता. ती जर दार असती तर, तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते.
गीतरत्न 8 : 10 (IRVMR)
(ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते. म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे.
गीतरत्न 8 : 11 (IRVMR)
(ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता. त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला, त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार शेकेल द्यावे लागत.
गीतरत्न 8 : 12 (IRVMR)
माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे. हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील.
गीतरत्न 8 : 13 (IRVMR)
(स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस. त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. मलाही तो ऐकू दे!
गीतरत्न 8 : 14 (IRVMR)
(ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर. सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14