जखऱ्या 7 : 1 (IRVMR)
{#1बनावट उपोषणाचा निषेध } [PS]पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले.
जखऱ्या 7 : 2 (IRVMR)
बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून पाठवले.
जखऱ्या 7 : 3 (IRVMR)
ते संदेष्ट्यांना आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरातील याजकांना म्हणाले: “प्रत्येक वर्षाच्या पाचव्या महिन्यात आम्ही उपवास करून शोक प्रकट करत आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का?” [PE]
जखऱ्या 7 : 4 (IRVMR)
[QS]मला सेनाधीश परमेश्वराकडून वचन मिळाले की: [QE]
जखऱ्या 7 : 5 (IRVMR)
[QS]“याजकांना आणि या देशातील इतर लोकांस सांग की तुम्ही सत्तर वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या [QE][QS]आणि सातव्या महिन्यात उपवास केला व शोक प्रकट केला. पण हा उपवास खरोखरच माझ्यासाठी होता का? [QE]
जखऱ्या 7 : 6 (IRVMR)
[QS]जे तुम्ही खाल्ले-प्यायले ते आपल्यासाठीच होते की नाही? [QE]
जखऱ्या 7 : 7 (IRVMR)
[QS]याच गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वराने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे घोषीत केले होते. [QE][QS]जेव्हा यरूशलेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, यरूशलेमेच्या भोवतालच्या गावात, नेगेबला व पश्चिमेकडील[* शेफेला ] डोंगरपायथ्याशी वस्ती होती. तेव्हादेखील देवाने हीच वचने सांगितली होती.” [QE]
जखऱ्या 7 : 8 (IRVMR)
{#1अवज्ञा हेच बंदिवासाचे कारण } [QS]परमेश्वराचे वचन जखऱ्याला मिळाले: [QE]
जखऱ्या 7 : 9 (IRVMR)
[QS]सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की “जे सत्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे. [QE]
जखऱ्या 7 : 10 (IRVMR)
[QS]विधवा, अनाथ, परके व गरीब यांना छळू नका. एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.” [QE]
जखऱ्या 7 : 11 (IRVMR)
[PS]पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले.
जखऱ्या 7 : 12 (IRVMR)
जे नियम सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करून जे धर्मशास्त्र व संदेष्ट्यांद्वारे वचन पाठवले ते लोक ऐकेनात. त्यांनी आपली मने पाषाणासारखी कठीण केली, तेव्हा सेनाधीश परमेश्वर कोपला. [PE]
जखऱ्या 7 : 13 (IRVMR)
[PS]तेव्हा असे झाले की, त्याने आवाहन केले पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याच प्रकारे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यांनी माझा धावा केल्यास, मी उत्तर देणार नाही.
जखऱ्या 7 : 14 (IRVMR)
एखाद्या वावटळीच्या वाऱ्याप्रमाणे मी त्यांना अनोळखी राष्ट्रांमध्ये पांगवीन. त्यांचा देश त्यांच्या मागे ओसाड पडेल व तेथे कोणी ये-जा करणार नाही, कारण, त्यांनी उत्तम देश वैराण केला आहे.” [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: