जखऱ्या 8 : 1 (IRVMR)
यरूशलेमेच्या जीर्णोद्धाराचे अभिवचन सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले.
जखऱ्या 8 : 2 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेसाठी खूप ईर्ष्यावान झालो आहे. तिच्या करीता क्रोधाने व आवेशाने ईर्ष्यावान झालो आहे.”
जखऱ्या 8 : 3 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”
जखऱ्या 8 : 4 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्त्री आणि वृध्द पुरुष यरूशलेमेच्या रस्त्यावर पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालतांना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल.
जखऱ्या 8 : 5 (IRVMR)
रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी गजबजून जाईल.
जखऱ्या 8 : 6 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट देशाला आश्चर्य वाटेल, म्हणून मलाही आश्चर्य वाटेल का?” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
जखऱ्या 8 : 7 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशातून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन.
जखऱ्या 8 : 8 (IRVMR)
मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”
जखऱ्या 8 : 9 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “आपले हात दृढ करा! सेनाधीश परमेश्वराने मंदिराच्या पुनर्निर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.
जखऱ्या 8 : 10 (IRVMR)
त्या दिवसापूर्वी, लोकांस काम मिळत नसे वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नसे. जाणे येणे शत्रूंमुळे सूरक्षित नव्हते. मी प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याविरुध्द भडकविले होते.
जखऱ्या 8 : 11 (IRVMR)
पण आता तसे पूर्वीच्या दिवसासारखे नसेल. मी उर्वरित लोकांबरोबर असणार.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
जखऱ्या 8 : 12 (IRVMR)
“ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांस वतन देईन.
जखऱ्या 8 : 13 (IRVMR)
शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!”
जखऱ्या 8 : 14 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.
जखऱ्या 8 : 15 (IRVMR)
“पण आता मात्र माझे मन:परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरूशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!
जखऱ्या 8 : 16 (IRVMR)
पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.
जखऱ्या 8 : 17 (IRVMR)
आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी शपथ देण्याची आवड धरू नका. कारण या गोष्टींचा मला द्वेष आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
जखऱ्या 8 : 18 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले.
जखऱ्या 8 : 19 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”
जखऱ्या 8 : 20 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरूशलेमेला येतील.
जखऱ्या 8 : 21 (IRVMR)
निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्यास शोधू.’ मीही येतो.”
जखऱ्या 8 : 22 (IRVMR)
पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरूशलेमेत येतील.
जखऱ्या 8 : 23 (IRVMR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दहा लोक यहूदी मनुष्याकडे येऊन त्याचा झगा पकडून त्यास विचारतील, ‘देव तुम्हाबरोबर आहे’ असे आम्ही ऐकले आहे! आम्ही तुम्हाबरोबर येतो.”
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23