सफन्या 2 : 1 (IRVMR)
भोवतालच्या राष्ट्रांचा नाश हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या.
सफन्या 2 : 2 (IRVMR)
फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या.
सफन्या 2 : 3 (IRVMR)
पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित रहाल.
सफन्या 2 : 4 (IRVMR)
गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल. ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल.
सफन्या 2 : 5 (IRVMR)
समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे. कनान, जो पलिष्ट्यांचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की, तुझ्यात कोणीही रहीवासी उरणार नाही.
सफन्या 2 : 6 (IRVMR)
तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल.
सफन्या 2 : 7 (IRVMR)
किनाऱ्याचा प्रदेश यहूदाच्या घराण्यातील राहिलेल्यांचा होईल. ते त्यावर आपले कळप चारतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील घरात विश्रांती घेतील, कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांची काळजी घेईल, आणि त्यांचे भविष्य पुनर्संचयित करीन.
सफन्या 2 : 8 (IRVMR)
मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत* मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत यार्देन नदीच्या बाजूला पूर्वेकडे मवाबी आणि अम्मोनी लोक हे यहूदाचे शेजारी होते. ते दोन्ही उत्पत्ती 19:30-38 नुसार अब्राहामाचा भाचा लोट ह्याचे वंशज होते. इस्राएल लोकांच्या बरोबर त्यांचे संबंध सहसा शत्रुत्वाचे होते. . त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.
सफन्या 2 : 9 (IRVMR)
ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”
सफन्या 2 : 10 (IRVMR)
मवाब व अम्मोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्याचा परमेश्वर याच्या लोकांस टोमणे मारले व त्यांची थट्टा केली.
सफन्या 2 : 11 (IRVMR)
ते लोक परमेश्वरास घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल, सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी व सर्व राष्ट्रद्विपे त्याची आराधना करतील.
सफन्या 2 : 12 (IRVMR)
अहो कूशींनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.
सफन्या 2 : 13 (IRVMR)
नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल.
सफन्या 2 : 14 (IRVMR)
तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.
सफन्या 2 : 15 (IRVMR)
जी नगरी आधी हर्षात व भीती शिवाय जगत होती, आणि आपल्या मनात म्हणत होती की, मीच आहे आणि माझ्याबरोबरीची दुसरी कोणीच नाही, तीच ही आहे. ती आता कशी ओसाड व वनपशू बसण्याचे स्थान अशी झाली आहे! आणि तिच्याजवळून जाणारा येणारा प्रत्येकजण फुसफुसणार व आपला हात हलवणार!

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15