1 इतिहास 16 : 1 (MRV)
1 लेवींनी करारकोश आत आणून दावीदाने उभाररलेल्या तंबूमध्ये तो ठेवला. मग त्यांनी देवाला होमार्पणे आणि शांती अर्पणे वाहिली.
1 इतिहास 16 : 2 (MRV)
2 हे झाल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला.
1 इतिहास 16 : 3 (MRV)
3 मग त्याने एकूनएक इस्राएल स्त्री-पुरुषांना एकएक भाकर, खजूर आणि किसमिस एवढे दिले.
1 इतिहास 16 : 4 (MRV)
4 दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते.
1 इतिहास 16 : 5 (MRV)
5 आसाफ हा पहिल्या गाटाचा मुख्य होता. त्याचा गट झांजा वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गाटाचा प्रमुख होता. इतर लेवी पुढीलप्रमाणे: उज्जियेल, शमिरामोथ, यहिएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत
1 इतिहास 16 : 6 (MRV)
6 बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी करार कोशापुढे रणशिंगे वाजवत.
1 इतिहास 16 : 7 (MRV)
7 परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
1 इतिहास 16 : 8 (MRV)
8 परमेश्वराचे स्तवन करा. त्याला हाक मारा. परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
1 इतिहास 16 : 9 (MRV)
9 परमेश्वराची स्तोत्रे गा. त्यांचे स्तवन म्हणा. त्याचे चमत्कार इतरांना सांगा.
1 इतिहास 16 : 10 (MRV)
10 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो.
1 इतिहास 16 : 11 (MRV)
11 परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.
1 इतिहास 16 : 12 (MRV)
12 देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा. त्याने केलेले न्याय आणि चमत्कारची कृत्ये यांचे स्मरण करा.
1 इतिहास 16 : 13 (MRV)
13 इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत. याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
1 इतिहास 16 : 14 (MRV)
14 परमेश्वर आमचा देव आहे. त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.
1 इतिहास 16 : 15 (MRV)
15 त्याच्या कराराचे स्मरण असू द्या. त्याने दिलेल्या आज्ञा पुढील हजारो पिढ्यांसाठी आहेत.
1 इतिहास 16 : 16 (MRV)
16 परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
1 इतिहास 16 : 17 (MRV)
17 याकोबासाठी परमेश्वराने तोच नियम केला. इस्राएलशी त्याने तसाच निरंतर करार केला.
1 इतिहास 16 : 18 (MRV)
18 इस्राएलला परमेश्वर म्हणाला, “मी तुम्हाला कनानचा प्रदेश देईन. ते वतन तुमचे असेल.”
1 इतिहास 16 : 19 (MRV)
19 त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, परक्या प्रदेशात उपरे होता.
1 इतिहास 16 : 20 (MRV)
20 तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता.
1 इतिहास 16 : 21 (MRV)
21 पण परमेश्वराने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. परमेश्वराने राजांना तशी ताकीद दिली.
1 इतिहास 16 : 22 (MRV)
22 परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका. माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
1 इतिहास 16 : 23 (MRV)
23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.
1 इतिहास 16 : 24 (MRV)
24 परमेश्वराच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा तो किती अद्भूत आहे ते सर्वांना सांगा.
1 इतिहास 16 : 25 (MRV)
25 परमेश्वर थोर आहे. त्याची स्तुती केली पाजिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.
1 इतिहास 16 : 26 (MRV)
26 का बरे? कारण जगातले इतर सगळी दैवते म्हणजे नुसत्या क्षुद्र मूर्ती पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
1 इतिहास 16 : 27 (MRV)
27 परमेश्वराला महिमा आणि सन्मान आहे. देव तेजस्वी लखलखीत प्रकाशाप्रमाणे आहे.
1 इतिहास 16 : 28 (MRV)
28 लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
1 इतिहास 16 : 29 (MRV)
29 त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
1 इतिहास 16 : 30 (MRV)
30 परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला. हे जग असे हलणार नाही.
1 इतिहास 16 : 31 (MRV)
31 पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
1 इतिहास 16 : 32 (MRV)
32 समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो.
1 इतिहास 16 : 33 (MRV)
33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल.
1 इतिहास 16 : 34 (MRV)
34 लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंतन आहे.
1 इतिहास 16 : 35 (MRV)
35 परमेश्वराला सांगा, “देवा, तूच आमचा त्राता आहेस. आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर. मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु. तुझा माहिमा गाऊ.”
1 इतिहास 16 : 36 (MRV)
36 इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते. त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत.सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
1 इतिहास 16 : 37 (MRV)
37 आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांना करार कोशाच्या नित्य दैनंदिन सेवेसाठी दावीदाने नेमले.
1 इतिहास 16 : 38 (MRV)
38 त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम आणि आणखी 68 लेवी यांना ठेवले. ओबेद-अदोम आणि होसा हे द्वाररक्षक होते. ओबेद - अदोम यदूथूनचा मुलगा.
1 इतिहास 16 : 39 (MRV)
39 सादोक हा याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांना दावीदाने गिबोन येथील उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर नेमले.
1 इतिहास 16 : 40 (MRV)
40 दररोज सकाळी आणि संध्याकाळी सादोक आणि इतर याजक होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर होमार्पणे करत असत. परमेश्वराने इस्राएलला जे नियमशास्त्र दिले होते त्यातील नियमांचे पालन करण्यासाठी ते असे करत होते.
1 इतिहास 16 : 41 (MRV)
41 परमेश्वराची कृपा निरंतर राहावी म्हणून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यासाठी हेमान, यदूथून व इतर लेवी यांची नेमणूक केली.
1 इतिहास 16 : 42 (MRV)
42 हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे व कर्णे फुंकणे हे काम होते. देवाची स्तुतिगीत गाईली जात असताना इतर वाद्ये वाजवण्याचेही काम त्यांच्याकडे होते. यदूथूनचे मुलगे द्वाररक्षक होते.
1 इतिहास 16 : 43 (MRV)
43 हा कार्यक्रम संपल्यावर सर्व लोक घरोघरी गेले. दावीदही आपल्या घराण्याला आशीर्वाद द्यायला घरी परतला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: