इफिसकरांस 3 : 1 (MRV)
या कारणासाठी मी, पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा कैदी आहे.
इफिसकरांस 3 : 2 (MRV)
देवाची कृपा तुमच्यापर्यंत पोचविण्याची व्यास्था करण्याचे काम माइयावर सोपवल्याचे तुम्ही जाणता
इफिसकरांस 3 : 3 (MRV)
आणि जशी मी अगोदर तुम्हांला थोडक्यात लिहिली होती ती देवाची गूढ योजना मला प्रकटीकरणाच्या द्वारे कळविण्यात आली.
इफिसकरांस 3 : 4 (MRV)
जर तुम्ही ती वाचाल तर तुम्हांला माझ्या ख्रिस्ताच्या रहरयाविषयीचे पूर्ण ज्ञान होणे शक्य होईल.
इफिसकरांस 3 : 5 (MRV)
मागील पिढ्यांमध्ये हे रहस्य मनुष्यांच्या पुत्रांना सांगण्यात आले नव्हते, जसे आता त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणान्यांना आत्म्याच्या द्वारे प्रकट करण्यात आले आहे.
इफिसकरांस 3 : 6 (MRV)
हे रहस्य ते आहे की, सुवार्तेद्वारे विदेशी लोक हे यहूदी लोकांबरोबर सहवारसदार आहेत, ते एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाने दिलेल्या अभिवचनामध्ये सहभागीदार आहेत.
इफिसकरांस 3 : 7 (MRV)
देवाच्या प्रभावी कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
इफिसकरांस 3 : 8 (MRV)
जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये लहानातील लहान आहे तरी मला हे देवाच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता यहूदीतरांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
इफिसकरांस 3 : 9 (MRV)
आणि रहस्यमय योजना सर्व लोकांना कळविण्यास सांगितली, ज्या देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्याच्याकडे काळाच्या सुरुवातीपासून ही रहस्यमय योजना देवामध्ये लपून अशी राहिली होती.
इफिसकरांस 3 : 10 (MRV)
यासाठी की आता मंडळीद्धारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे.
इफिसकरांस 3 : 11 (MRV)
देवाच्या अनंतकाळच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले.
इफिसकरांस 3 : 12 (MRV)
त्या ख्रिस्तामध्ये आम्हांला देवाच्या समक्षतेत आमच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास आहे.
इफिसकरांस 3 : 13 (MRV)
म्हणून, मी प्रार्थितो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या वलेशामुळे तुम्ही माघार घेऊ नये. कारण हे वलेश आमचे गौरव आहेत.
इफिसकरांस 3 : 14 (MRV)
(14-15) या कारण्यासाठी ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे, त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो.
इफिसकरांस 3 : 15 (MRV)
इफिसकरांस 3 : 16 (MRV)
मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी.
इफिसकरांस 3 : 17 (MRV)
आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंत:करणात राहावा. व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतित मुळावलेली असावी.
इफिसकरांस 3 : 18 (MRV)
यासाठी की, सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हांला सामर्थ्यप्राप्त व्हावे.
इफिसकरांस 3 : 19 (MRV)
आणि ख्रिस्ताची प्रीति जी ज्ञान्यांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे.
इफिसकरांस 3 : 20 (MRV)
आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हांमध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्य आहे,
इफिसकरांस 3 : 21 (MRV)
त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्यासाठी सदासर्वकाळ गौरव असो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21