यहेज्केल 5 : 1 (MRV)
(1-2) “मानवपुत्रा, तुझ्या भुकेच्या वेळे नंतर,तू ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तू एक धारदार तलवार घे. न्हाव्याच्या वस्तऱ्याप्रमाणे ती वापर आणि तुझे केस व दाढी कापून टाक. केस तराजूत घालून त्यांचे वजन कर. तुझ्या केसांचे तीन सारखे भाग कर. तुझे 1/3 केस (एक भाग) ‘नगरीवर (विटेवर) ठेव आणि जाळ. याचा अर्थ काही लोक नगराच्या आत मरतील. मग तलवारीने 13 केसांचे (आणखी एका भागाचे) बारीक बारीक तुकडे कर आणि ते नगरीभोवती (विटेभोवती) टाक. ह्याचा अर्थ काही लोक नगरामध्ये मरतील. मग राहिलेले 13 केस (उरलेला भाग) हवेत भिरकावून दे. वारा त्यांना दूर उडवून नेऊ देत. ह्याचा अर्थ मी तलवार उपसून दूरच्या देशांपर्यंत जाऊन काही लोकांचा पाठलाग करीन.
यहेज्केल 5 : 3 (MRV)
पण तू जाऊन काही केस आण व त्यांना तुझ्या अंगरख्यात बांध. ह्याचा अर्थ माझ्या काही लोकांना मी वाचवीन.
यहेज्केल 5 : 4 (MRV)
उडून गेलेल्या केसातील काही केस मिळव आणि ते विस्तवावर टाक. ह्याचा अर्थ अग्नी इस्राएलच्या संपूर्ण घराचा जाळून नाश करील.”
यहेज्केल 5 : 5 (MRV)
मग परमेश्वर, माझा प्रभू मला म्हणाला, “ती वीट म्हणजे जणू यरुशलेम आहे. मी यरुशलेमला इतर राष्ट्रांच्या मध्ये ठेवले आहे. आणि तिच्याभोवती इतर देश आहेत.
यहेज्केल 5 : 6 (MRV)
यरुशलेमच्या लोकांनी माझ्या नियमांविरुद्ध बंड केले. दुसऱ्या कोठल्याही राष्ट्रांपेक्षा ते वाईट आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या देशांतील लोकांपेक्षा त्यांनी माझे नियम जास्त मोडले. त्यांनी माझ्या आज्ञा मानायचे नाकारले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत.”
यहेज्केल 5 : 7 (MRV)
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकट आणीन. का? कारण तुम्ही माझे नियम पाळले नाहीत, माझ्या आज्ञा मानल्या नाहीत. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हीच माझे नियम अधिक मोडलेत. एवढेच नाही तर ते लोक ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणत होते, त्याच तुम्ही केल्यात.”
यहेज्केल 5 : 8 (MRV)
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “म्हणून आता मी सुद्धा तुमच्या विरुद्ध आहे. ते इतर लोक पाहात असतानाच मी तुला शिक्षा करीन.
यहेज्केल 5 : 9 (MRV)
पूर्वी कधी केल्या नव्हत्या अशा गोष्टी मी तुला करीन. आणि तशा भयंकर गोष्टी मी कधीच पुन्हा करणार नाही. का? कारण तुम्ही फार भयंकर गोष्टी केल्या.
यहेज्केल 5 : 10 (MRV)
यरुशलेममधील लोक उपासमारीने एवढे हैराण होतील की आईवडील मुलांना व मुले आईवडीलांना खातील. मी अनेक मार्गांनी तुम्हाला शिक्षा करीन. ज्यांना मी जिवंत ठेवलंय त्यांना मी सगळीकडे पसरवीन.”
यहेज्केल 5 : 11 (MRV)
परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.
यहेज्केल 5 : 12 (MRV)
तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.
यहेज्केल 5 : 13 (MRV)
ह्यानंतरच तुमच्या लोकांवरचा माझा राग मावळेल. माझ्याशी ते अतिशय वाईट वागले, त्यामुळे त्यांना शिक्षा होत आहे, हे मला माहीत आहे. तसेच, ‘मीच परमेश्वर आहे व त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमापोटीमी त्यांच्याशी बोललो हे त्यांना त्या वेळी समजेल.”
यहेज्केल 5 : 14 (MRV)
देव म्हणाला, “यरुशलेम, मी तुझा नाश करीन. मग तू म्हणजे नुसता दगडमातीचा ढीग होशील. तुझ्या आजूबाजूचे लोक तुझी चेष्टा करतील. प्रत्येक येणारा जाणारा तुझी टर उडवेल.
यहेज्केल 5 : 15 (MRV)
तुझ्या आजूबाजूचे लोक जशी तुझी चेष्टा करतील, तसेच तुझ्यावरुन ते धडाही घेतील. मी रागावलो आणि तुला शिक्षा केली हे ते पाहतील. मी खूपच संतापलो होतो. मी तुला ताकीद दिली. मी परमेश्वर, काय करणार आहे, ते तुला सांगितले होते.
यहेज्केल 5 : 16 (MRV)
मी तुझ्यावर उपासमारीची भयंकर वेळ आणीन, मी तुझा नाश करणाऱ्या गोष्टी तुझ्याकडे पाठवीन, हे मी तुला सांगितले होतेच. ती उपासमारीची वेळ पुन्हा पुन्हा यावी. मी तुझा धान्य पुरवठा बंद करीन हे मी तुला सांगितले होते.
यहेज्केल 5 : 17 (MRV)
मी तुझ्यावर उपासमार आणि हिंस्त्र प्राणी पाठवीन आणि ते तुझ्या मुलांना मारतील हे मी तुला सांगितले होते. नगरात सगळीकडे रोगराई व मृत्यू थैमान घालेल आणि शत्रू सैनिकांना तुझ्याविरुद्व लढण्यासाठी आणीन, असे मी तुला बजावले होते. ह्या सर्व गोष्टी घडतील असे मी म्हणजेच परमेश्वराने तुला सांगितले होते आणि तसेच घडेल.”
❮
❯