उत्पत्ति 36 : 1 (MRV)
एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ
उत्पत्ति 36 : 2 (MRV)
एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा
उत्पत्ति 36 : 3 (MRV)
आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
उत्पत्ति 36 : 4 (MRV)
एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते.
उत्पत्ति 36 : 5 (MRV)
आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.
उत्पत्ति 36 : 6 (MRV)
(6-8) याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला.
उत्पत्ति 36 : 9 (MRV)
एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:
उत्पत्ति 36 : 10 (MRV)
एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.
उत्पत्ति 36 : 11 (MRV)
अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;
उत्पत्ति 36 : 12 (MRV)
अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक.
उत्पत्ति 36 : 13 (MRV)
रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.
उत्पत्ति 36 : 14 (MRV)
सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते.
उत्पत्ति 36 : 15 (MRV)
एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज
उत्पत्ति 36 : 16 (MRV)
कोरह, गाताम व अमालेख;हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले.
उत्पत्ति 36 : 17 (MRV)
एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.
उत्पत्ति 36 : 18 (MRV)
एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;
उत्पत्ति 36 : 19 (MRV)
हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.
उत्पत्ति 36 : 20 (MRV)
एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन,
उत्पत्ति 36 : 21 (MRV)
अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.
उत्पत्ति 36 : 22 (MRV)
लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.)
उत्पत्ति 36 : 23 (MRV)
शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
उत्पत्ति 36 : 24 (MRV)
सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)
उत्पत्ति 36 : 25 (MRV)
अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
उत्पत्ति 36 : 26 (MRV)
दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.
उत्पत्ति 36 : 27 (MRV)
एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.
उत्पत्ति 36 : 28 (MRV)
दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते.
उत्पत्ति 36 : 29 (MRV)
होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना,
उत्पत्ति 36 : 30 (MRV)
दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले.
उत्पत्ति 36 : 31 (MRV)
इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.
उत्पत्ति 36 : 32 (MRV)
बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती.
उत्पत्ति 36 : 33 (MRV)
बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.
उत्पत्ति 36 : 34 (MRV)
योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले.
उत्पत्ति 36 : 35 (MRV)
हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.
उत्पत्ति 36 : 36 (MRV)
हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
उत्पत्ति 36 : 37 (MRV)
साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
उत्पत्ति 36 : 38 (MRV)
शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले.
उत्पत्ति 36 : 39 (MRV)
बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
उत्पत्ति 36 : 40 (MRV)
(40-43) एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे-तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले.
❮
❯