यशया 37 : 1 (MRV)
हिज्कीयाने सेनापतीचा निरोप ऐकला. निरोप ऐकताच त्याने आपले कपडे फाडले. नंतर त्याने शोकप्रदर्शक कपडे घातले व तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
यशया 37 : 2 (MRV)
हिज्कीयाने कारभारी (एल्याकीम) चिटणीस (शेबना) आणि याजकातील वडिलधारी मंडळी (नेते) ह्यांना अमोजचा मुलगा यशया या प्रेषिताकडे पाठविले. त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.
यशया 37 : 3 (MRV)
ते तिघे यशयाला म्हणाले, “आजचा दिवस विशेष शोकाचा व दु:खाचा समजावा असा हिज्कीया राजाने हुकूम दिला आहे. हा दिवस फार दु:खाचा असेल. कळा सुरू व्हाव्यात पण प्रसूती होऊ नये तसा हा दिवस असेल.
यशया 37 : 4 (MRV)
सेनापतीने सांगितलेल्या गोष्टी, परमेश्वर तुमचा देव कदचित् ऐकेल. अश्शूरच्या राजाने प्रत्यक्षातील देवाबद्दल वाईटसाईट बोलण्यास आपल्या सेनापतीला पाठविले आणि परमेश्वराने, तुमच्या देवाने. ती निंदा ऐकली. इस्राएलमध्ये राहिलेल्या थोड्या लोकांसाठी प्रार्थना करा.”
यशया 37 : 5 (MRV)
(5-6) हिज्कीयाचे नोकर यशयाकडे गेले. यशया त्यांना म्हाणाला, “तुझ्या धन्याला पुढील गोष्टी सांग : परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही सेनापतीकडून जे ऐकले त्याने घाबरून जाऊ नका. माझ्याबद्दल अश्शूरची “मुले” जे वाईट बोलत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका.
यशया 37 : 6 (MRV)
यशया 37 : 7 (MRV)
पाहा! मी माझा आत्मा अश्शूरविरूध्द पाठवीन. अश्शूरच्या राजाला, त्याच्या देशाला असलेल्या धोक्याच्या सुचनेचा वृत्तांत समजेल मग तो त्याच्या देशाला परत जाईल. त्या वेळी त्याच्याच देशात मी त्याला तलवारीने मारीन.”‘
यशया 37 : 8 (MRV)
(8-9) अश्शूरच्या राजाला एक वृत्तांत कळला तो वृत्तांत असा होता: “कूशचा राजा तिऱ्हाका तुमच्यावर स्वारी करण्यास येत आहे.” म्हणून अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले व तो लिब्नाला गेला. सेनापतीने हे ऐकले व तो राजा लढत होता तेथे म्हणजे लिब्नाला गेला नंतर सेनापतीने हिज्कीयाकडे दूत पाठविले. सेनापती म्हणाला,
यशया 37 : 9 (MRV)
यशया 37 : 10 (MRV)
“तुम्ही पुढील गोष्टी यहुदाचा राजा हिज्कीया याला सांगाव्या: तू ज्या देवावर विश्वास ठेवतोस त्याच्याकडून फसू नको.‘देव अश्शूरच्या राजाकडून यरूशलेमचा पराभव होऊ देणार नाही.”‘ असे म्हणू नको.
यशया 37 : 11 (MRV)
ऐक! तू अश्शूरच्या राजांबद्दल ऐकले आहेस. अश्शूरच्या सैन्याने प्रत्येक देशाचा पराभव केला आहे. अश्शूरचा राजा तुझा पराभव करून तुला ठार मारील.
यशया 37 : 12 (MRV)
त्या सर्व पराभूत झालेल्या लोकांना त्यांच्या देवांनी वाचविले का? नाही माझ्या पूर्वजांनी त्यांचा नाश केला. माझ्या सैन्याने गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातील एदेनमध्ये राहणाऱ्या लोकांचा पराभव केला.
यशया 37 : 13 (MRV)
हमाथ आणि अर्पाद येथील राजे कोठे आहेत? सफखाईमचा राजा कोठे आहे? हेनाचा व इव्वाचा राजा कोठे आहे? ते सर्व संपले नाश पावले.
यशया 37 : 14 (MRV)
हिज्कीयाने दूतांकडून संदेश घेऊन वाचला. नंतर हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. हिज्कीयाने तो संदेश उघडून परमेश्वरापुढे ठेवला.
यशया 37 : 15 (MRV)
तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला:
यशया 37 : 16 (MRV)
सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करूब देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. देवा, तुझी आणि तुझीच सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.
यशया 37 : 17 (MRV)
परमेश्वरा माझे म्हणणे ऐक डोळे उघड आणि सन्हेरिबकडून आलेला संदेश पाहा. सन्हेरिबने मला हा संदेश पाठविला, त्यात जिवंत देवाची म्हणजेच तुझी निंदानालस्ती केली आहे.
यशया 37 : 18 (MRV)
परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने खरोखरीच सर्व देश व त्यांची भूमी यांचा नाश केला आहे.
यशया 37 : 19 (MRV)
त्याने त्या देशांतील देव जाळले आहेत पण ते देव खरे नव्हते. माणसाने घडविलेले ते पुतळे होते. ते फक्त लाकूड व दगडच होते. म्हणून ते हरवले व नष्ट झाले.
यशया 37 : 20 (MRV)
पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.
यशया 37 : 21 (MRV)
नंतर आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठविला. यशया म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो. ‘तू परमेश्वराची, इस्राएलच्या देवाची, प्रार्थना केलीस. सन्हेरिबकडून आलेल्या निरोपासाठी ती प्रार्थना होती. मी ती प्रार्थना ऐकली आहे.’
यशया 37 : 22 (MRV)
“सन्हेरिब बाबत परमेश्वराचा संदेश असा आहे:‘अश्शूरच्या राजा, सियोनची वधू (यरूशलेम) तुला महत्व देत नाही. ती तुला हसते. यरूशलेमची कुमारी मुलगी, तुझी टर उडविते.
यशया 37 : 23 (MRV)
अश्शूरच्या राजा, तू माझी निंदा केलीस. तू माझी चेष्टा केलीस. मी कोण आहे हे तुला माहीत आहे का? पापण्या उंचावून स्वर्गाकडे पाहा. मग तुला दिसेल की इस्राएलच्या पवित्र देवाची तू निंदा केली आहेस.
यशया 37 : 24 (MRV)
परमेश्वर, माझ्या प्रभुविरूध्द बोलण्यासाठी तू तुझ्या नोकरांचा उपयोग केलास. तू म्हणालास, “मी फार सामर्थ्यवान आहे माझ्याजवळ पुष्कळ रथ आहेत माझ्या बळावर मी लबानोनला हरविले. मी तेथील उंच डोंगरावर चढलो. मी तेथील सर्व उंच झाडे (सैन्ये) तोडली, मी तेथील उंच डोंगरावर व घनदाट जंगलात जाऊन आलो.
यशया 37 : 25 (MRV)
मी विहिरी खणल्या व नवीन ठिकाणी पाणी प्यायलो. मी मिसरच्या नद्या सुकवल्या व त्या प्रदेशावरून चालत गेलो.”
यशया 37 : 26 (MRV)
“पण देव म्हणतो, “अश्शूरच्या राजा, मी, देवाने फार पूर्वीच हे केले आहे हे तू ऐकलेच असशील. फार वर्षापूर्वी मी अश्शूरला निर्मिले, मीच तुला येथवर आणले. मीच तुला त्या शहरांचा नाश करण्याची परवानगी दिली. माझे काम करून घेण्यासाठी आणि त्या शहरांना दगडधोड्यांच्या राशीत बदलण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
यशया 37 : 27 (MRV)
त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते. ते घाबरलेले व खजील झालेले होते. शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते. घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते. ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील गरम झळांनी जळून जाते.
यशया 37 : 28 (MRV)
मी तुझ्या सैन्याबद्दल व तुझ्या लढायांबद्दल सर्व जाणतो. तू कधी विश्रांती घेतलीस, कधी युध्दावर गेलास व युध्दावरून घरी कधी परतलास हे सर्व मला माहीत आहे. तू माझ्यावर रागावला आहेस, हे ही मला ठाऊक आहे.
यशया 37 : 29 (MRV)
तू माझ्यावर रागावला आहेस व माझी निंदा केली आहेस. तुझे बोलणे मी ऐकले. म्हणून मी तुला शिक्षा करीन. मी तुझ्या नाकात वेसण घालीन. तुला लगाम घालीन आणि तू ज्या रस्त्याने माझ्या देशात आलास, त्याच रस्त्याने मी तुला माझ्या देशातून हाकलून देईन.”
यशया 37 : 30 (MRV)
नंतर परमेश्वर हिज्कीयाला म्हणाला, “हिज्कीया, माझे हे बोलणे खरे आहे हे दाखविण्यासाठी मी तुला खूण देईन. ह्या वर्षी धान्य पेरले जाणार नाही. म्हणून या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षांच्या पिकातील जुनं धान्य खावे लागेल. पण तीन वर्षांत तुम्ही पेरलेले धान्य खाल. तुम्ही पिकाची कापणी कराल आणि तुमच्याजवळ खाणे मुबलक असेल तुम्ही द्राक्षांची लागवड कराल आणि द्राक्षे खाल.
यशया 37 : 31 (MRV)
“यहुदाच्या वंशातील काही लोक वाचले त्या थोड्या लोकांचे खूप मोठे राष्ट्र होईल. मुळे खोलवर रूजून भक्कम वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते लोक असतील मुळे खोल रूजलेल्या झाडांना खूप फळे लागतात. त्याचप्रमाणे ह्या लोकांना पुष्कळ संतती होईल.
यशया 37 : 32 (MRV)
जिवंत राहिलेले थोडे लोक यरूशलेममधून येतील सियोनच्या डोंगरावरून वाचलेले येतील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या तीव्र प्रेमामुळे हे होईल.
यशया 37 : 33 (MRV)
म्हणून अश्शूरच्या राजाला परमेश्वराचा संदेश असा आहे.“तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, तो ह्या शहराच्या दिशेने एकसुध्दा बाण मारणार नाही. तो ढाली घेऊन ह्या शहराशी लढण्यास पुढे सरसावणार नाही. तो वेशीच्या भिंतीला उतरंड बांधणार नाही.
यशया 37 : 34 (MRV)
तो आला त्याच रस्त्याने स्वत:च्या देशाला परत जाईल. तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, हा परमेश्वराने दिलेला संदेश होता.
यशया 37 : 35 (MRV)
देव म्हणतो:मी ह्या शहराचे रक्षण करीन. आणि त्याला वाचवीन. मी हे माझ्यासाठी आणि माझा सेवक दाविदासाठी करीन.”
यशया 37 : 36 (MRV)
मग परमेश्वराच्या दूताने जाऊन अश्शूरच्या तळावरील 185,000 माणसांना ठार मारले. सकाळी उठून लोक पाहतात तो त्यांच्या सभोवती प्रेते पडलेली.
यशया 37 : 37 (MRV)
मग अश्शूरचा राजा, सन्हेरिब निनवेला परत गेला आणि तेथेच राहिला.
यशया 37 : 38 (MRV)
एके दिवशी, सन्हेरीब त्याच्या निस्त्रोख देवाच्या देवळात पूजा करीत असताना, त्याच्या दोन मुलांनी, अद्रम्मेलेक व शरेसर यांनी, त्यास तलवारीने ठार मारले. मग ते अराराटला पळून गेले. म्हणून सन्हेरीबचा मुलगा एसर-हद्दोन अश्शूरचा राजा झाला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38