शास्ते 20 : 1 (MRV)
तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.
शास्ते 20 : 2 (MRV)
इस्राएलाच्या सर्व वंशातील वडिलधाऱ्या मंडळीनी या सभेत आपापल्या जागा घेतल्या. चार लाखांचे सैन्य तलवारी घेऊन सज्ज होते.
शास्ते 20 : 3 (MRV)
इस्राएल लोक मिस्पा येथे जमा झाल्याची बातमी बन्यामीन लोकांच्या कानावर आली. आता ही भयंकर घट्या घडली कशी याची इस्राएलांनी विचारणा सुरु केली.
शास्ते 20 : 4 (MRV)
तेव्हा त्या अत्याचाराला बळी पडेलेल्या बाईचा नवरा सर्व हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, “बन्यामीनांच्या अखत्यारीतील गिबा येथे मी आणि माझी उपपत्नी रात्रीच्या मुक्कामासाठी राहिलो.
शास्ते 20 : 5 (MRV)
रात्री तेथील लोकांनी आम्ही उतरलो होतो त्या घराला गराडा घातला. त्यांना माझा जीव घ्यायचा होता. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती मेली.
शास्ते 20 : 6 (MRV)
तेव्हा तिला येथपर्यंत आणून मी तिचे तुकडे केले आणि तुम्हाला ते सर्व प्रांतात एकेक पाठवून दिले. बन्यामीनी लोकांनी किती अघोर पाप केले आहे हे कळावे म्हणून आपल्या वाटणीच्या बारा भागात ते मी पाठवले.
शास्ते 20 : 7 (MRV)
तेव्हा इस्राएलच्या लोकहो, तुम्हीच सांगा. आता आपण कोणते पाऊल उचलायचे ते ठरवा.”
शास्ते 20 : 8 (MRV)
तेव्हा सर्व जण एकदिलाने उठून उभे राहिले आणि एकमुखाने म्हणाले, “आता मागे फिरणे नाही. या कृत्याचा बदला घेतल्याखेरीज कोणीही घराचे तोंड पाहणार नाही.
शास्ते 20 : 9 (MRV)
आता असे करु गिबातील लोकांना धडा शिकवण्यासाठी आधी चिठ्ठ्या टाकून परमेश्वराचा कौल घेऊ.
शास्ते 20 : 10 (MRV)
मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषामागे दहा. हजारामागे शंभर आणि दहा हजारातून हजारजण निवडू. ते सैन्याला रसद पोचवतील. आपले सैन्य बन्यामीनांच्या गिबा शहरावर तुटून पडेल. या बेशरम कृत्याबद्दल त्यांचे पारिपत्य करील.”
शास्ते 20 : 11 (MRV)
याबद्दल एकमत होऊन सर्व इस्राएल लोक गिबा शहरापाशी जमा झाले. आपण काय करायला निघालो आहोत याबद्दल त्यांचे एकमत होते.
शास्ते 20 : 12 (MRV)
त्यांनी बन्यामीन लोकांकडे संदेश पाठवला की तुमच्यापैकी काही जण या अधम, लजिरवाण्या कृत्याला जबाबदार आहेत.
शास्ते 20 : 13 (MRV)
तेव्हा त्यांना गिबा शहरातून बाहेर काढून आमच्या हवाली. करा. ते लोक आम्हाला द्या म्हणजे आम्ही त्याना ठार मारु इस्राएलींमधून ही कीड नाहीशी केली पाहिजे.
शास्ते 20 : 14 (MRV)
पण इस्राएल मधील आपल्या भाऊबंदांच्या या दूताचे म्हणणे बन्यामीनांनी ऐकले नाही.
शास्ते 20 : 15 (MRV)
आणि बन्यामीनच्या वंशातील लोकांनी आपली शहरे सोडली आणि ते गिबा शहराकडे इस्राएलींशी लढण्यासाठी गेले.
शास्ते 20 : 16 (MRV)
बन्यामीनांकडे युध्दाचे खास प्रशिक्षण घेतलेले सव्वीस हजारांचे सैन्य होते. शिवाय गिबाचे सातशै सैनिक होते.
शास्ते 20 : 17 (MRV)
याखेरीज सातशे निवडक डावखुरे सैनिक होते. त्यांचे वैशिष्ट्य असे की गोफणीने अचूक नेमहाजी करण्यात त्यांचा हात धरणारे कुणी नव्हते.
शास्ते 20 : 18 (MRV)
बन्यामीन वगळता, इस्राएल लोकांच्या सर्व टोव्व्यांनी चार लाख लढवय्ये जमा केले त्या चार लाखांपैकी प्रत्येकाकडे तलवारी होत्या त्यातील प्रत्येक जण प्रशिक्षित सैनिक होता.
शास्ते 20 : 19 (MRV)
हे इस्राएल लोक बेथेल येथे गेले बन्यामीनांवर आपल्यापैकी कोणी आधी हल्ला करावा याबाबत त्यांनी परमेश्वराचा कौल घेतला.
शास्ते 20 : 20 (MRV)
दुसऱ्या दिवशी पहाटे इस्राएलांनी गिबा समोर तळ ठोकला.
शास्ते 20 : 21 (MRV)
सर्व तयारीनिशी बन्यामीनांवर हल्ला करायला ते गिबा नगराशी चालून गेले.
शास्ते 20 : 22 (MRV)
बन्यामीनांचे सैन्य त्यांच्यावर हल्ला करायला बाहेर पडले. लढाईच्या पहिल्या दिवशी त्यांनी इस्राएलांच्या बावीस हजार जणांना ठार केले.
शास्ते 20 : 23 (MRV)
(23-24) यावर इस्राएल लोकांनी संध्याकाळ होईपर्यंत परमेश्वराची करुणा भाकली. आपल्याच बांधवांवर पुन्हा हल्ला करावा का, अशी त्यानी विचारणा केली.परमेश्वराने त्यांना पुन्हा निर्धाराने चालून जाण्यास सांगितले तेव्हा एकमेकांना धीर देत आदल्या दिवसाप्रमाणेच ते बन्यामीनांवर चाल करुन गेले.
शास्ते 20 : 24 (MRV)
शास्ते 20 : 25 (MRV)
लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली.
शास्ते 20 : 26 (MRV)
बन्यामीनांनी इस्राएलांचा हल्ला परतवला आणि त्यांनी आणखी अठरा हजार माणसांना ठार मारले. युध्दात कामी आलेले सर्व सैनिक चांगले तरवारबहाद्दर होते.
शास्ते 20 : 27 (MRV)
पुन्हा सर्व इस्राएल लोक बेथेल येथे आले. तेथे बसून त्यांनी रडकुंडूला येऊन परमेश्वरापुढे गाऱ्हाणे मांडले. दिवसभर त्यांच्यापैकी कोणीही अन्र घेतले नाही. परमेश्वाला यज्ञार्पणे आणि शांति अर्पणे वाहिली.
शास्ते 20 : 28 (MRV)
इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न विचारला (त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश बेथेल येथे होता)
शास्ते 20 : 29 (MRV)
अहरोन पुत्र एलाजार याचा मुलगा फिनहास हा तेव्हा याजक होता. इस्राएलांनी विचारले. “बन्यामीन आमचे बांधवच आहेत. पुन्हा आम्ही त्यांच्यावर चाल करुन जावे की ही लढाई संपुष्टात आणावी?” परमेश्वराने सांगितले, “चाल करुन जा. उद्या मी तुमच्या हातून त्यांचा पराभव करवतो.”
शास्ते 20 : 30 (MRV)
मग इस्राएलांनी काही जणांना गिबा शहराभोवती विखरुन दबा धरुन बसायला सांगितले. अशी मांडणी केल्यावर तिसऱ्यावर तिसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच ते गिबावर हल्ला करायला चाल करुन गेले.
शास्ते 20 : 31 (MRV)
बन्यामीनांचे सैन्यही गिबा शहराबाहेर पडून इस्राएलींसमोर युध्दाला सामोरे आले. यावर इस्राएल लोकांनी एकाएकी लढाईतून पाठ फिरवली आणि ते पळ काढू लागले. बन्यामीन त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार मारण्यासाठी त्याच्या मागे गेले. या युक्तीने इस्राएल लोकांनी बन्यामीन सैन्याला आपल्या शहरापासून पार दूरवर पळवत नेले.बन्यामीनांनी पूर्वी प्रमाणेच या हल्लात इस्राएलाचे सैन्य कापून काढायला सुरुवात केली. रस्त्यात, शेतात अशी जवळपास तीस माणसे त्यांनी ठार केली. येथून एक रस्ता बेथेल शहराकडे आणि एक गिबाकडे जात होता.
शास्ते 20 : 32 (MRV)
पूर्वीप्रमाणेच आपला जय होत आहे असे बन्यामीनांना वाटले. इस्राएल पळ काढत होते. पण ती त्यांची एक चाल होती. बन्यामीनांना शहरापासून लांब रस्तयावर यायला लावायचे असा त्यांचा डाव होता. प्रथम यहूदाने जावे असे परमेश्वराने सांगितले
शास्ते 20 : 33 (MRV)
असे करत ते बआल-तामार येथे थांबले. गिबाच्या पश्चिमेला काही इस्राएल लपून राहिले होते. त्यांनी गिबावर हल्ला केला.
शास्ते 20 : 34 (MRV)
इस्राएलच्या दहाहजाराच्या निवडक सैन्याने गिबावर चढाई केली. तेथे चांगलेच तुंबळ युध्द झाले. या भीषण हल्ल्याची बन्यामीनांना आधी जराही चाहूल लागली नव्हती.
शास्ते 20 : 35 (MRV)
परमेश्वराने इस्राएलांकडून बन्यामीनाचा पाडाव करवला. त्यादिवशी बन्यामीनांचे पंचवीस हजार एकशे सैनिक लढाईत कामी आले. ते सर्व चांगले खंदे लढवय्ये होते.
शास्ते 20 : 36 (MRV)
तेव्हा आपण हरलो आहोत हे बन्यामीनांच्या लक्षात आले.इस्राएल लोकांचे सैन्य आता मागे हटले. कारण गनिमी काव्याने छापा घालण्यावर त्यांची भिस्त होती. त्यांची माणसे गिबा येथे लपून बसली होती.
शास्ते 20 : 37 (MRV)
दडून राहिलेले लोक गिबात घुसले आणि त्यांनी शहरातील एकूण एक सर्वाना तलवारीने कापून काढले.
शास्ते 20 : 38 (MRV)
हे काम झाल्यावर मोठ्ठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहून काम फते झाल्याचे बाकी इस्राएलांना कळेल असा संकेत ठरला होता.
शास्ते 20 : 39 (MRV)
(39-41) बन्यामीनांनी इस्राएलांच्या तीस सैनिकांना मारले तेव्हा त्यांना वाटले आपली दरवेळेप्रमाणेच जीत होत आहे. पण मग त्यांनी शहरातून धूराचा लोट येताना पाहिले. मागे पाहतात तर सर्व शहरात आग लागलेली. इस्राएल सैन्याने पळ थांबवला. पाठ फिरवून ते युघ्दाला भिडले. बन्यामीनी लोक घाबरले भंयकर संकटाची आत्ता कुठे त्यांना कल्पना आली.
शास्ते 20 : 40 (MRV)
शास्ते 20 : 41 (MRV)
शास्ते 20 : 42 (MRV)
त्यांनी इस्राएलांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन पळ काढला. वाळवंटाच्या दिशेने ते पळू लागले पण लढाईतून त्यांची सुटका होईना. आता शहरांतून इस्राएल लोक बाहेर पडले आणि त्यांचा धुव्वा उडवला.
शास्ते 20 : 43 (MRV)
बन्यामीनांना वेढा घालून त्यांना कोंडीत पकडले. अशाप्रकारे सर्व बाजूंनी हैराण करुन, गिबाच्या पूर्वेला त्यांना पुर्ण नेस्तनाबूत करुन टाकले.
शास्ते 20 : 44 (MRV)
बन्यमीनांचे अठरा हजार खंदे योध्दे या लढाईत मरण पावले.
शास्ते 20 : 45 (MRV)
जे वाचले त्यांतील काही रिम्मोन खडकाकडे पळून गेले. पण या वाटेवर इस्राएल लोकांनी त्यांचे पाच हजार सैनिक टिपले. गिदोमपर्यंत त्यांनी पाठलाग चालूच ठेवला. या ठिकाणी आणखी दोन हजार जणांना ठार मारले.
शास्ते 20 : 46 (MRV)
या दिवशी बन्यामीनांची पंचवीस हजार माणसे मारली गेली. लढाईत त्यांनी शौर्य गाजवले.
शास्ते 20 : 47 (MRV)
पण बन्यामीनांची सहाशे माणसे वाळवंटात निसटून गेली. ती पळ काढून रिम्मोन खडकापर्यंत पोचली आणि तिथे त्यांनी चार महिने तळ देला.
शास्ते 20 : 48 (MRV)
इस्राएल लोकांनी बन्यामीनाच्या प्रदेशात फिरुन तेथील प्रत्येक गावातील एकूणएक लोकांना ठार केले. सर्व शहरे भस्मसात केली.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: