नहूम 1 : 1 (MRV)
हे पुस्तक म्हणजे एल्कोश येथील नहूमला झालेला दृष्टांन्त आहे. निनवेया शहराबद्दलचा हा शैंकसंदेश आहे.
नहूम 1 : 2 (MRV)
परमेश्वर हा ईर्षावान देव आहे परमेश्वर अपराध्यांना शिक्षा करतो आणि तो खूप रागावतो परमेश्वर त्याच्या शत्रूंना शिक्षा करतो. तो त्याच्या शत्रूंवर रागावलेला असतो.
नहूम 1 : 3 (MRV)
परमेश्वर जसा सहनशील आहे, तसाच सामर्थ्यवान आहे परमेश्वर अपराधी लोकांना शिक्षा करील. त्यांना मोकळे सोडणार नाही परमेश्वर वाईट माणसांना शिक्षा करण्यासाठी येत आहे झंझावात आणि वादळ यांच्याद्धारे तो आपली शक्ती दाखवील माणूस जमिनीवर धूळीतून चालतो, तर परमेश्वर ढगांवरून चालतो.
नहूम 1 : 4 (MRV)
परमेश्वर समुद्राला कठोरपणे बोलेल आणि समुद्र आटेल तो सर्व नद्या कोरड्या पाडेल बाशान व कर्मेल येथील समृध्द प्रदेश सुकून नष्ट होईल लबानोनमधील फुले कोमेजतील.
नहूम 1 : 5 (MRV)
परमेश्वर येईल तेव्हा पर्वतांचा भीतीने थरकाप होईल टेकड्या वितळून जातील परमेश्वर येईल तेव्हा धरणी भयभीत होऊन थरथर कापेल. एवढेच नाही तर, हे जग आणि त्यातील प्रत्येक माणूस भीतीने कापेल.
नहूम 1 : 6 (MRV)
परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल. तो येताच खडक हादरतील.
नहूम 1 : 7 (MRV)
परमेश्वर फार चांगला आहे. संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो
नहूम 1 : 8 (MRV)
पण त्याच्या शत्रूंचा तो पूर्णपर्ण नाश करील पुराच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वर त्याना धुवून टाकील अंधारातून तो त्याच्या शत्रूंचा पाठलाग करील.
नहूम 1 : 9 (MRV)
यहूदा, तू परमेश्वराविरुध्द कट कारचत आहेस? पण परमेश्वर संपूर्ण विनाश करणार आहे. त्यामुळे तू पुन्हा त्रास देणार नाहीस.
नहूम 1 : 10 (MRV)
भांड्याखाली जळणाव्या काटेरी झुडपाप्रमाणे तुझा संपूर्ण नाश होईल सुक्या काटक्या जशा चटकन् जळून जातात, तसा तुझा पटकन् नाश होईल.
नहूम 1 : 11 (MRV)
अश्शूर, तुझ्याकडून एक माणूस आला. त्याने परमेश्वराविरुध्द कट रचला. त्याने वाईट सल्ला दिला.
नहूम 1 : 12 (MRV)
परमेश्वराने यहूदाला पुढील गोष्टी सांगितल्या अश्शूरचे लोक चांगले बलवान आहेत. त्यांच्यापाशी मोठे सैन्य आहे. पण ते मारले जातील. त्यांचा अंत होईल माझ्या लोकांनो, मी तुम्हाला त्रास दिला पण यापुढे, कधीही मी तुम्हाला त्रास देणार नाही.
नहूम 1 : 13 (MRV)
आता मी तुमची अश्शूरच्या सत्तेपासून मुक्तता करीन मी तुमच्या मानेवरचे जोखड काढून घेईन तुम्हाला बांधणाव्या साखळ्या मी तोडून टाकीन.
नहूम 1 : 14 (MRV)
अश्शूरचा राजा परमेशवर तुझ्याबद्दल पुढील आज्ञा देतो: तुझे नाव लावायला तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. तुझ्या दैवळातील कोरलेल्या मूर्ती व धातूचे पतळे यांचा मी नाश करीन मी तुझे थडगे तयार करत आहे. कारण तुझा विनाश लवकरच ओढवणार आहे.
नहूम 1 : 15 (MRV)
यहूदा पाहा! पर्वतांवरून कोण येत आहे, ते पाहा! शुभवार्तीघेऊन दूत येत आहे तो म्हणतो की तेथे शांतता आहे यहूदा तुझे खास सण साजरे कर तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले आहेस त्या गोष्टी कर दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करुन तुझा पराभव करणार नाहीत त्या सर्व दुष्टांचा नाश झाला आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15